प्रियकराने केली प्रेमात फसवणूक प्रेयसीने घेतला असा बदला
यु के / नवप्रहार डेस्क
प्रेम ही अशी गोष्ट आहे जे झाल्यावर तरुण म्हणा अथवा तरुणी ते वेगळ्याच जगात वावरत असतात. त्यांना जगाशी काही घेणेदेणे नसते.त्याला फक्त ती आणि तीला फक्त तो हवा असतो. पण यात जर एखाद्याने धोका दिला तर त्याचे परिणाम फार गंभीर देखील होऊ शकतात. सहसा हे सगळ्याच प्रकरणात होत नाही.पण काही प्रकरणात प्रेमी किंवा प्रेयसी टोकाची भूमिका घेतात तसल्यातूनच हे प्रकरण
निकोलस आणि फियोना यांच्यात प्रेम संबंध होते. फियोना ही शाळेत टीचर होती. निकोलस तिच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान होता. दोघात प्रेम संबंध जुळून आले . पण फियोनाला जेव्हा हे समजले की निकोलस चे इतर महिलांसोबत संबंध आहेत तर फियोनाला त्याचा राग यायचा. पण निकोलस हा रंगीत स्वभावाचा असल्याने ती त्याला घाबरत देखील होती. पण एकदा निकोलस ने दिलेल्या धोक्याचा बदला घ्यायचा असे तिने ठरवले आणि तसा प्लॅन आखला.
त्याने निकोलस ला सेक्स साठी उसकवले आणि त्याला बाथरूम मध्ये घेऊन गेली. आणि दरम्यान तिने जवळच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करून तिची हत्या केली. इतकंच काय तर मृतदेह घटना स्थळाजवळ असलेल्या कब्रस्थानमध्ये दफनही केला. या गुन्ह्याची उकल तब्बल 4 महिन्यानंतर झाली.
42 वर्षीय निकोलस बिलिंघमच्या हत्येप्रकरणी प्रेयसी फियोना बील हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, प्रियकर निकोलचे इतर महिला आणि तरुणींसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे तिला त्याचा राग यायचा. ती त्याला याबाबत विचारायचा प्रयत्न करायची पण घाबरत होती. कारण तो सोडून जाईल याची तिला भीती होती.
निकोलसचा स्वभाव रागीट असल्याने तो आपला जीव घेईल अशी भीतीही तिला होती. आरोपी फियोना टिचर असून तिच्याकडे एक डायरी सापडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, “त्या डायरीत लिहिलं आहे की, घटना 1 नोव्हेंबर 2021 ची आहे. तिने संध्याकाळी त्याची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी तिने एक कट रचला होता. ” त्या डायरीच्या मदतीने पोलिसांनी तिला दोषी ठरवलं आहे. हत्येच्या बहुतांश गोष्टी तिने त्यात नोंदवल्या होत्या.
“टीचर असलेल्या फियोनाने शाळेत कोविड झाल्याचं सांगितलं, तसेच क्वारंटाईनमध्ये असल्याचं सांगितलं. त्यानंतर प्रियकराला बोलवून त्यास संबंध ठेवण्यास उकसवलं. बाथरुममध्ये संधी मिळताच तिने त्याची हत्या केली. “, असं पोलिसांनी पुढे सांगितलं. आरोपी फियोनाला कोर्टात हजर केलं असता तिने हा गुन्हा केला नसल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, मृत्यूचे कारण त्याच्या मानेवर वार केलेली खोल जखम होती. तपास पथकाला तळघरात रक्ताने माखलेली गादी आणि बेडरूममध्ये बेडवर रक्ताचे डाग आढळून आले. कुंब्रिया पोलिसांच्या वकीलांनी कोर्टात सांगितले.