हटके

सुकेश चंद्रशेखर च्या त्या चॅट मुळे केजरीवाल च्या अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love

हा आहे @15 किलोग्रामीट घी चा अर्थ

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

अफरातफरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखर ने केलेल्या एका दाव्यामुळे दिल्लीच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सुकेश भ्रष्टाचार आणि पैशांच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याने काही दिवसांपूर्वी केजरीवालांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचे म्हटले होते. केजरीवाल आणि टीआरएस पार्टीचे रॅकेट असल्याचा दावा त्याने केला आहे. केजरीवालांसोबत आपली चॅटिंग झाली होती. त्यात त्यांनी १५ कोटी रुपये बीआरएस कार्यालयात पोहोचविण्यास त्यांनी मला सांगितले होते, असा दावा सुकेश याने केला आहे. टीआरएस नेत्यांना हे पैसे मिळाल्याचे देखील या चॅटमध्ये उल्लेख असल्याचे सुकेशने म्हटले आहे. हे निर्देश केजरीवाल आणि सत्येंद्र जैन सारख्या आपच्या नेत्यांनी दिले होते, असा दावा त्याने केला आहे.

एका प्रेस रिलीजमध्ये सुकेश याने हा दावा केला आहे. दारु कांडातील हे प्रकरण आहे. या डिलिव्हरीला @15 किलोग्रामीट घी असा कोडवर्ड वापरून सहकारी अरुण पिल्लई यांना देण्यास सांगितले गेले होते. हा व्यक्ती हे पैसे त्याच्या काळ्या रंगाच्या Range Rover Sport मध्ये ठेवले होते. ही कार टीआरएस मुख्यालयात होती आणि त्यावर एमएलसीचा स्टीकर लावलेला होता, असेही त्याने म्हटले आहे.

तुम्हाला हे दावे खरे-खोटे करायचे असतील तर मी यांच्यासोबत नार्को, पॉलिग्राफ किंवा अन्य कोणत्याही चाचण्या करण्यास मी तयार आहे. मी प्रत्येक दाव्याला पुरावा देत आहे, असेही सुकेशने म्हटले आहे. त्याच्याकडे केजरीवाल आणि त्याच्यातील WhatsApp आणि telegram चॅटचे ७०० पानांचे स्क्रीन शॉट असल्याचाही दावा त्याने केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close