सामाजिक

चांदुर रेल्वे शहरासह ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसाचा दिसतोय असर 

Spread the love
उकाडा वाढला
चांदुर रेल्वे  ता. प्र. प्रकाश रंगारी
 दिनांक 15 मे रोजी बुधवार ला दुपारी 1ते 1:30 वाजताच्या दरम्यान, चांदुर रेल्वे शहरात व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे नागरिकांना तीव्र उखाड्यापासून थोडा दिलासा मिळाला खरा. पण दुसऱ्या दिवसापासून उकाडा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
 सलग काही दिवसापासून तापमाणात कमालीची वाढ बघायला मिळत होती. तेव्हा अमरावती जिल्हाचे तापमान हळु हळु वाढून 44 अंश सेल्सियसच्या च्या  जवळपास  पोहचले होते. गुरुवारी सकाळपासूनच चांदुर रेल्वे शहरातील तसेच ग्रामीण भागातील गावामध्ये तीव्र उन्हाचा आणि उकाड्याचा जोर वाढला होता.
 यानंतर दुपारी 1:00 ते 1:30 वाजताच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्यामुळे, चांदुर रेल्वे शहरवासीयांना व ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना उन्हापासून होत असलेल्या त्रास.आता होणार नसल्याचे लोकांकडून सांगितल्या जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close