Uncategorized

चांदुर बाजार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली

Spread the love

चांदुर बाजार / प्रतिनिधी

पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे मिळालेल्या माहितीवरून मोर्शी ते चांदूरबाजार रोड वर पोलीस स्टेशन चांदूरबाजार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारे एकूण 98 गोवंश (बैल) एकूण कींमत 34,20,000 रूपये जनावरांना पकडून ताब्यात घेतले, यातील आरोपी इसम हे सोबत कोणतीही कागदपत्र न बाळगता सदरच्या जनावरांना अत्यंत क्रूरपणे एकमेकांना घट्ट बांधून विना चारा पाण्याचे, काठीने व पुरानी ने मारहाण करून घेऊन जात होते. सदर गोवंश जनावरांना क्रूरपणे बांधून, अवैधरित्या कत्तली करता घेऊन जात असलेल्या 6 इसमांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला ,आरोपी नामे आकाश संजय परतेती रा. मोर्शी यास गुन्ह्यात ताब्यात घेतले असून इतर आरोपी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पसार झाले .
सदरची कार्यवाही *गौरक्षा हिंदू दल महाराष्ट्र* टीम आणि मा. पोलीस अधीक्षक श्री विशाल सिंगूरि सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी सर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिवलाल भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरज बोंडे, API निखिल निर्मळ ,API प्रमोद राऊत ,PSI निलेश डाबेराव , ASI विनोद इंगळे, अमोल सानप,HC नितीन डोंगरे ,दिनेश राठोड ,दिलीप मुळे, अरविंद सरोदे, कोकचा सलामे , आशिष इंगळे , गणेश आगोळे, निकेश गाढवे,भूषण अवघड, रुपेश श्रीवास, पंकज येवले, सागर चव्हाण ,गौरव पूसदकर यांनी केली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close