सामाजिक
यवतमाळ शहरात गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात संपन्न
यवतमाळ / अरविंद वानखडे
यवतमाळ शहरामध्ये गणेश विसर्जन ला सुरुवात झाली असून यवतमाळ चा राजा मारवाडी चौक येथील गणेशाचे विसर्जन मिरवणूक फार मोठी होती तसे शहरातील अनेक मंडळांची सुद्धा मिरवणूक मेन रोड येथून लकडगंज येथील विहिरीत करण्यात आले. नगरपरिषद यवतमाळ च्या वतीने अनेक ठिकाणी गणेश उत्सव विसर्जनाकरिता जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच ईद-ए-मिलाद सुद्धा मोठ्या उत्सवाने यवतमाळ करांना पहावयास मिळाला शहराच्या मध्यभागी असलेल्या शारदा चौक ते कळम चौक ह्या परिसरामध्ये इस्लामी झेंडे लावून तसेच बँड डीजे लावून मोठ्या उत्साहाने ईद-ए-मिलाद पार पडली दोन्ही उत्सवाला यवतमाळकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त सुद्धा फार तगडा लावण्यात आला होता.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1