क्राइम

चांदणी मॅडम एसीबी च्या ताब्यात 

Spread the love
10 हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक 
यवतमाळ / नवप्रहार न्यूज नेटवर्क
 
              वडिलांच्या नावाने असलेल्या रास्त भाव दुकानाच्या प्राधिकार पत्रावर  स्वतःच्या नावाची नोंद करून देण्याची आर्जव करणाऱ्या तक्रारदारा कडून अहवाल लवकर सादर करण्याकरिता 20 हजारांची लाच मागणाऱ्या 
त्यापैकी 10 हजार पूर्वीच घेऊन उरलेले 10 हजार रुपये कार्यालयात स्वीकारताना एसीबी ने महिला निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. चांदणी शेषराव शिवरकर असे आरोपी महिलेचे नाव आहे. 
.
तालुक्यातील वाई रुई येथील ४२ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे रास्त भाव धान्य दुकान होते. दुकान प्राधिकार पत्रावर वारस म्हणून तक्रारदाराच्या नावाची नोंद करायची होती. यासाठी तहसील कार्यालय येथे लवकर अहवाल सादर करण्याकरीता पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी शिवरकर यांनी तडजोडी अंती २० हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये तक्रारदार यांनी नाईलाजास्तव यापूर्वीच दिले आहे. उर्वरित १० हजार रूपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत सविस्तर तक्रार एसीबी पथकाकडे करण्यात आली होती.
याबाबतचा मोबदला म्हणून १० हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर चांदणी शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम त्यांच्या कक्षात स्वीकारल्याने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close