आध्यात्मिक

सावंगा विठोबा नगरीत “श्रीकृष्ण जन्माष्टमी ” निमित्त “चंदन उटी” कार्यक्रम आणि “जन्माष्टमी-सोहळा

Spread the love

चांदुर रेल्वे ता. प्र. प्रकाश रंगारी

अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २६/८/२०२४ सोमवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने “श्रीकृष्ण जन्माष्टमी ” निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आणि रात्री ८ वाजता संस्थानमध्ये संस्थानचे वार्षिक उत्सव प्रमाणे “जन्माष्टमी सोहळा” आयोजित करण्यात आलेला आहे.
*चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे.*
संस्थानमध्ये दि.५/८/२०२४ ते दि.८/९/२०२४ पर्यंत संस्थान तर्फे “श्रावण मास” निमित्त “अखंड जागृती भजन” मांडीचा दैनंदिन कार्यक्रम महाराजांच्या कृपाशीर्वादाने गावातील आणि बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांच्या सहकार्याने अविरतपणे चालू आहे .*
ज्या भाविक भक्तांना “सेवापर्मोधर्म” या भावनेने संस्थानमध्ये “सेवाधारी” म्हणून महाराजांचे चरणी निस्वार्थ सेवा समर्पित करावयाची आहे, त्यांनी संस्थानशी संपर्क साधावा,असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वै.नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर रा.राऊत, सचिव अशोक ह.सोनवाल सर्व विश्वस्त विनायक तु.पाटील,वामण के.रामटेके,गोविंद रा.राठोड,दिगांबर ना.राठोड,अनिल दि.बेलसरे,फुलसिंग रु.राठोड,चरणदास ना.कांडलकर,वैभव दि.मानकर, स्वप्निल ब.चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close