महिलांच्या त्या टॉवेल डान्स व्हिडिओ ने इंटरनेट वर घातला धुमाकूळ
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
तरूणी किंवा महिला या कुठे फिरायला किंवा सहलीसाठी गेल्या तर त्या रील्स किंवा व्हिडिओ बनवणार नाही हे कसं शक्य आहे ? कारण व्हिडिओ आणि रील्स बनवून त्या सोशल मीडियावर टाकणार नाही ही जवळजवळ अशक्य अशी गोष्ट. महिला आणि तरूणी भरतात हा प्रकार करतात. विदेशात जर या महिला गेल्या तर मग काय विचारता. कारण एकतर तेथील संस्कृती आणि त्यावर मोकळेपणा. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत स्विझरलँड येथे फिरायला गेलेल्या महिलांनी टॉवेल वर व्हिडिओ बनवत तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओ ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओ ला ५४ लाखांपेक्षा जास्त व्हयुज मिळाले आहे. पण या व्हिडिओ मुळे भारतात खळबळ माजली आहे.
भारतातील या महिला स्वित्झर्लंडमध्ये फिरण्यासाठी गेल्या. आता कुणीही कुठे फिरायला गेलं की साहजिकच तिथं फोटो, व्हिडीओ काढणं आलंच. या महिलांनीही तसाच व्हिडीओ बनवला. तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतातल्या लोकांना धक्का बसला आहे.
फक्त टॉवेल गुंडाळून महिलांचा व्हिडीओ
या महिला फक्त टॉवेल गुंडाळून होत्या. तशाच अवस्थेत त्या टेरेसवर गेल्या. त्यांच्या हातात कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत. अंगावर फक्त टॉवेल आणि हातात कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन या महिला टेरेसवर नाचत आहेत. हा व्हिडिओ अरिषा आणि अमिता शर्मा (@arishamitha) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघंही दिसत आहेत. ‘स्वित्झर्लंडमध्ये स्वस्त नशा’ असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. तसंच व्हिडीओच्या वर लिहिलं आहे, ‘आपलं वय वाढत आहे, पण आपलं आयुष्य नाही, अशी भावना आहे.’ म्हणजे त्यांचे वय वाढत असले तरी त्यांचे आयुष्य अजूनही तरुण मुलींसारखे आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही काळ्या कपड्यातील एक महिला हातात कोल्ड्रिंकची बाटली घेऊन कॅमेऱ्यासमोर येते. यानंतर इतर महिलाही आनंदात नाचत पुढे येतात. ज्यांनी बाथरोब घातलं आहे. बँकग्राऊंडमध्ये हेरा फेरी फिल्ममधील ‘ए मेरी जोहराजबीन’ हे गाणं वाजत आहे, ज्यावर या महिला खूप मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व महिलांचं वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे. पण त्यांची मजामस्ती पाहून त्या कॉलेजमधील तरुणी आहेत, असंच वाटतं. या महिला खऱ्या अर्थाने जिवंतपणाचं उदाहरण आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये व्हिडीओ भारतात खळबळ
महिलांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ५४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांनी लाईक आणि शेअर केले आहेत. शेकडो कमेंट्सही आल्या आहेत. पण बहुतांश लोकांच्या कमेंट्स वाचल्यानंतर असं दिसतं की या व्हिडिओने भारतात खळबळ उडवून दिली आहे.
या व्हिडिओवर कमेंट करताना माहीने लिहिले आहे की, वयाची सुरुवात ४० वर्षानंतरच होते. त्याच्या आधीच्या आयुष्यात फक्त संशोधन चालतं. त्याचवेळी ऐश्वर्या नावाच्या मुलीने तिच्या मैत्रिणीला टॅग करून कमेंट केली, आम्ही तुमच्या बॅचलर ट्रिपमध्ये असं काही प्लान करू शकतो का?, मितुशीने तिच्या दोन मैत्रिणींना टॅग करत तिला तिचा वेडेपणा आठवला असं लिहिलं. त्याचवेळी, महागड्या ठिकाणी जाऊन स्वस्तात नशेची मजा काही औरच असते, अशी प्रतिक्रिया सिंपल गुप्ता नावाच्या तरुणीनं दिली आहे. तर रुबी नावाच्या एका महिलेने कमेंट केली आहे की मी माझ्या आयुष्यात अशा वेड्या ग्रुपला खूप मिस करते. रुख्शाना बेग या युजरने लिहिलं आहे की, हा व्हिडिओ मूर्खपणाचा आहे. त्याचवेळी काही लोकांनी या महिलांना सल्लाही दिला आहे.