सामाजिक

भातकुली तालुक्यातील आसरा येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका

Spread the love

 

घरांची पडझड, अनेक संसार उघड्यावर*

नितीन कदम यांनी आसरा नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

अमरावती / प्रतिनिधी
भातकुली तालुक्यात अचनाक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आसरा गावासह अनेक शेतामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे.आज आलेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेक घरांचे पत्रे उडाली आहेत. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे टिनपत्रे उडाली आहेत.चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. चक्रीवादळात काही नागरिक किरकोळरित्या जखमी झाले आहेत. येथील जिल्हा परीषद शाळेची सुध्दा पडझड झाली.उन्हाळ्याच्या सुट्या असल्या कारणाने जीवितहानी टळल्याचे नाकारता येत नाही.विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला.दरम्यान सदर अतिवृष्टी अवकळी चक्रीवादळच्या पावसामुळे जैद म्हणजेस झयाद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी कदम यांनी तालुक्यातील विविध गावासह शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आढावा घेतला. यावेळी “कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही”, नितीन कदम यांनी माध्यमासमोर बोलतांना खंत व्यक्त केली. वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्ह्यांतून अधिकारी नियुक्त करावेत. त्याचबरोबर यासाठी मनुष्यबळही पाठवण्याची मांगणी शासनाला केली . तीन दिवसात बहुतांश भागातील पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाला सांगून ताशेरे ओढले. दरम्यान, अतिवृष्टी अवकळी व चक्रीवादळामुळे तालुक्यातील विविध गावामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी व प्रतिनिधि पाठवून त्यांनी तालुक्यासाठी तातडीने मदत जाहीर करावी. कदम यांनी मांगणी केली आहे. “निसर्ग चक्रीवादळामुळे आसरा येथे प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील विविध गावामधील नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामध्ये खाजगी मालमत्तेसह सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचा समावेश आहे. माझी पालकमंत्री व प्रशासन यांच्याकडे हीच मागणी राहणार आहे की, नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदतीचं धोरण ठेवलं पाहिजे”, असं नितीन कदम म्हणाले आहेत. यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम,सरपंच अशोकराव मोहोळ,परेश मोहोड,सचिन देशमुख,राहुल वानखडे,धीरज देशमुख,पंकज दहिकर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद,समस्त आसरा ग्रामस्थ उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close