लोखंडी रॉड मारून तरुणाने केली आईची हत्या

मोर्शी (प्रतिनिधी )
लोखंडी सलाख मारून मुलाकडून आईची हत्या, गाडगे नगर झोपडपट्टीतील घटना , आरोपी मोर्शी पोलिसांच्या ताब्यात
शहरातील दमयंती नदीच्या काठावर असलेल्या गाडगेबाबा नगर येथे पती-पत्नीच्या भांडणात झालेल्या झटापटीत मध्यस्थी करणाऱ्या आईच्या छातीत लोखंडी सलाख घुसल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री दि.१नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ९ वाजताचे सुमारास घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ.रजनी कौर नरसिंग बावरी वय २८ वर्ष (शिकलकारी)ही आपले पती नरसिंग बावरी वय ३५ वर्ष,दोन मुली,एक मुलगा तसेच आई सीता कौर रमेशसिंग बावरी वय ५२ वर्ष गाडगे नगर मोर्शी परिसरात राहतात. सीता बावरी व पती नरसिंग बावरी हात मजुरीचे काम करून घरचा उदरनिर्वाह करतात.सौ.रजनी हिचे लग्न २०१३ ला झाले तेव्हापासून तिचे पती नरसिंग बावरी हा मद्यप्राशन करून छोट्या मोठ्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण पत्नीला करतो. बुधवार दि.१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिचे पती नरसिंग बावरी हा दारू पिऊन घरी आल्यावर जेवणातील भाजीच्या वादावरून पत्नीला मारहाण केली इतकेच नव्हे तर मद्यधुंद पती नरसिंग याने घरातील लोखंडी सलाख हातात घेऊन तुला आज मारूनच टाकतो म्हणून लोखंडी सलाख घेऊन मारायला गेला असता रागाच्या भरात मध्यस्थी करायला आलेल्या आईच्या ती सलाख छातीच्या डाव्या बाजूला मारली.लगेच आजूबाजूच्या लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेत तिला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर काही वेळात तिचे निधन झाले.शेवटी नरसिंग बावरी वय ३५ वर्ष यांनी मद्यप्राशन करून जेवणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा माझी सासू त्यांना आवरायला आडवी आली तर रागाच्या भरात त्यांनी माझे सासूचे छातीवर डाव्या बाजूने सलाख मारून ठार केल्याची फिर्याद मोर्शी पोलीस स्टेशनला नोंदविली.याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादविच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब करीत आहे.गुरुवारी दि.२ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतक सीता कौर रमेशसिंग बावरी यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मृतक महिलेवर शोकाकुळ वातावरणात हिंदू स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.