सामाजिक

स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन पुसद तहसील कार्यालय येथे साजरा

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी

उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळा पुसद तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पुसद येथील उपविभागीय अधिकारी, एकनाथराव काळबांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महाराष्ट्र पोलीस पथक तथा गृहरक्षक दल यांच्या तर्फे तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन सलामी देण्यात आली. तसेच सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे, पुसद नगर परिषदेचे मुख्य प्रशासक, तथा मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, तहसीलदार महादेव जोरवर, परीक्षाविधीन तहसीलदार पल्लवी आखरे, निवासी नायब तहसीलदार जी. एन. कदम, नायब तहसीलदार व्ही जी इंगोले, नायब तहसीलदार आर के तुपसुंदरे, नायब तहसीलदार आर.एम. शेख,
पुसद पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संजय राठोड, उप अभियंता, सतीश नांदगावकर, शाखा अभियंता सिरसागर, पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेशरकर, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती,
स्वातंत्र्याचा हा 76 वा वर्धापन दिन आपण सर्वांनी मिळुन एकजुटीने साजरा करून या व भारत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे सहकार्य केल्यास भारत निश्चितच महासत्ता बनेल असे गौरव उद्गागार उपविभागीय अधिकारी एकनाथराव काळबांडे यांनी शुभेच्छा पर बोलताना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोशटवार विद्यालयाचे शिक्षक, राजेश कोटलवार यांनी केले.तर आभार नायब तहसीलदार जी. एन.कदम, यांनी केले या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तथा विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडिया तथा प्रिंट मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी,
पोलीस पथक, गृहरक्षक दल,
सेवानिवृत्त माजी सैनिक, तथा विविध क्षेत्रातील मान्यवर महिला व बालक इत्यादीची या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close