से. फ. ला. विद्यालयात ” बालिका दिन ” उत्साहात साजरा..
धामणगाव रेल्वे- तालुका प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 3 जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे तर प्रमुख उपस्थिती विद्यालयाचे शिक्षक विनायक कडू व प्राध्यापक जगदीश टावरी हे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या शिक्षिका प्रीती घावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या वर्ग सहावी व सातवीच्या 22 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. वर्ग सातवीच्या विद्यार्थिनींनी समाजातील कर्तृत्ववान महिला झाशीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला डॉ.आनंदीबाई जोशी,धावपटू पी.टी. उषा,राजमाता जिजाऊ, प्रथम महिला आयपीएस किरण बेदी तर वर्ग सहावीच्या विद्यार्थिनींनी सिंधुताई सपकाळ, प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, बॅडमिंटन पटू सायना नेहवाल, अंतराळवीर कल्पना चावला यांच्याप्रमाणे वेशभूषा धारण करून त्यांची व्यक्तिरेखा साकार करून महिला सशक्तिकरणाचे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या भाषणातून व्यक्त केले.. काही विद्यार्थिनींनी लेक वाचवा लेक शिकवा ही नाटिका सादर केली..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीची विद्यार्थिनी हर्षदा भिल हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग सहावी ची विद्यार्थिनी निधी बिरे हिने केले..
बालिका दिन निमित्त विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापूरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ज्ञानाई सावित्रीबाई फुले चे सुंदर चित्र रेखाटन साकार केले. वरील सहभागी सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या शिक्षिका रिता मरसकोल्हे,छाया पालीवाल,सोनाली चव्हाण, वैशाली बोकडे, प्रीतम नाईक, चैताली टावरी, दीक्षा दीक्षित तसेच विद्यालयाचे उपप्रचार्य गोपाल मुंधडा, पर्यवेक्षक प्रा.प्रदीप मानकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी करता मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक 4 जानेवारी 2024
गुरुवार