क्राइम
लग्नाचे आमिष देत शारीरिक शोषण ; बलात्काराचा गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तसेच मंदिरात लग्न करून पती पत्नी प्रमाणे राहणाऱ्या इसमाने सोबत राहण्यास नकार दिल्याने आणि तुझ्या कडून जे होते ते करून घे. या गोष्टीची वाच्यता केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देणाऱ्या इसमाचा विरोधात महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरचा पेअकार तालुक्यातील मंगरूळ दस्तागिर येथे घडला आहे,.
महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार ती पती पासून मागील 15 वर्षांपासून विभक्त राहते. तिला 21 आणि 17 वर्षाची दोन मुले असून त्याजची नावे अनुक्रमे वेदांत आणि तुषार आहेत. यातील वेदांत हा शेतीची कामे करतो. त्याच्या सोबत काम करणारा उमेश शालीकराव काळे 35 याचे नेहमी घरी येनेजाणे असल्याने महिला आणि उमेश यांच्यात ओळखी झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दि. 20 जून 2021 रोजी दुपारी 12.30 वा दरम्यान नेहमी प्रमाणे उमेश शालिकराम काळे हा तिच्या घरी आला तेव्हा ती घरी एकटीच होती. तिची दोन्ही मुले बाहेर गावात गेली होती. तेव्हा उमेश काळे याने तिच्या जवळ येवून तिला सांगीतले की, तू तुझ्या पती पासून वेगळी राहते. तुला कोणीच नाही आपण दोघेही लग्न करू. आपण दोघांनी लग्न केल तर मी तूला नविन घर सूध्दा बांधून देईल लय करण्याचे आश्वासन ऐकून ती त्याच्या म्हणन्याला होकार दिला. उमेशने तिचे दोन्ही हात पकडून तिला आतील खोलीत नेले व खाली जमीनीवर पाडले, त्यानंतर त्याने तिचे संपूर्ण कपडे काढले व त्याचे सुध्दा संपूर्ण कपडे काढले त्याने माझे सोबत शारिरीक संभोग केला. त्यानंतर सूध्दा उमेश काळे हा नेहमी नेहमी महिलेच्या घरी यायचा व घरी कोनी नसतांना तिचे सोबत शारिरीक संबंध प्रस्तापीत करायचा. परंतू तो लग्न करण्यास तयार नव्हता.
महिला उमेश कडे लग्नाचा तगादा लावत असे, शेवटी तगादयामूळे तो तयार होवून आम्ही दोघांनी दि26/3/2023 रोजी कोटेश्वर ता आव जि वर्धा येथील मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. उमेश काळे हा जून 2023 पर्यंत तिच्या सोबत राहीला व त्याने त्या दरम्यान सुध्दा वारंवार तिचे सोबत शारिरीक संबंध
प्रस्थापित केले. दि. 12/06/2023 रोजी चे सकाळी 10.30 या दरम्यान उमेश काळे हा मी आईकडे जातो असे म्हणून निघून गेला. व त्या दिवशी परत आला नाही. दूस-या दिवशी दि 13/6/2023 रोजी महिला उमेशचा शोध घेण्यासाठी त्याच्या आईच्या घरी गेली असता उमेश येथे आला नसल्याचे त्याच्या आईने सांगीतले. उमेश काळेची महिले ने आनखी दोन दिवस वाट पाहिली. परंतू उमेश न आल्यामुळे तिने शेवटी दि 15/6/2023 रोजी पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीतर येथे हरविल्याबाबत रिपोर्ट दिला. रिपोर्ट दिल्यानंतर काही दिवसांनी उमेश काळे मिळून आला त्याला तीने घरी जावून विचारना केली कि तू घरी का आला नाहीस तेव्हा तो मला म्हटला की मला आता तूझ्या सोबत रहायचे नाही आहे. आपण जे हार टाकले ते लग्न पण मला मान्य नाही आहे. तूला काय करायचे ते करें. कुठ काही बोलली तर मी तूला जिवंत सोडनार नाही असे म्हटले, हे सर्व ऐकून महििलेला धक्का बसला. त्या दिवसापासून तीउमेश यास विनंवनी करत होती की आपण सोबत राहू परंतू त्याने माझे काही ऐकून घेतले नाही. शेवटी उमेशने आपला केवळ वापर केला हे लक्षात आल्याने आज रोजी पोलीस स्टेशनला येवून त्याचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणेकरीता रिपोर्ट देत आहे. आदेशाने सदरचा गून्हा कलम 376 (2) (N), 506 भादवि प्रमाणे दाखल करण्यात आला.