कार व आयसर धडक, भीषण अपघात. एकाच कुटूंबातील दोघांचा मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी.
वाडी / प्रतिनिधी
नागपूर वरून अमरावतीचा दिशेने वेगाने जाणाऱ्या काळ्या रंगाची चारचाकी कार ने रस्ता दुभाजक ओलांडून आय सर ला दिलेल्या जोरदार धडकेत समोर बसलेले महिला व पुरुष यांचा जागीच मृत्यू व मागे बसलेली मुलगी गंभीर जखमी.
वाडी पोलीस स्टेशनं अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल चौकात आज दुपारला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. प्रत्यक्ष दर्शनी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार काळ्या रंगाची कार नागपूर कडून अमरावती चा दिशेने अतिशय वेगाने जात असताना चालकाचा चा वाहणावरून नियंत्रण सुटले कार ने रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक (आयसर ) ला जोरदार धडक दिली त्यात कार चा समोर बसले ली महिला व चालक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. मागचा सीट वर बसलेली मुलगी गंभीर जखमी झाली तिला तातडीने ने नागपूर येथील दंद्दे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा कुटुंब अंजनगाव सुर्जी चा असल्याची माहिती आहे. ट्रकला समोर नुकसान झाले असून ट्रक ड्रायवार व क्लीनर सुखरूप आहेत. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.