निवड / नियुक्ती / सुयश

कॅप्टन डोबाळे यांना ‘ मानद डॉक्टरेट ‘ या दैदिप्यमान सन्मानाने अकोट च्या शिरपेचात मानाचा तुरा 

Spread the love

 

बाळासाहेब नेरकर कडुन

भारत सरकार द्वारा यावर्षी २६ जानेवारी निमित्य ७ पद्धमंविभूषण व १९ पध्दमंभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्काराने प्रतिष्ठीत मान्यवरांना अलंकृत करण्यात आले.
सोबतच अकोट चे सुपूत्र कॅप्टन सुनील डोबाळे यांना सुद्धा अतिशय प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा गांधी पिस फाउंडेशन नेपाळ व गांधी पीस फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम वर्धा येथे ” मानद डॉक्टरेट ” ने कॅप्टन सुनील डोबाळे यांना उद्या दिनांक 9 फेब्रुवारी 2025 ला भव्य अशा कार्यक्रमात सेवाग्राम वर्धा येथे १९४९ मध्ये जागतीक शांतता सभा जेथे झाली होती त्याच सभागृहात सन्मानित करण्यात येणार आहे.
ही उपलब्दी समस्त अकोट व अकोला जिल्हा वासियाकरता अभिमानाची व गौरवाची बाब आहे. कॅप्टन सुनीलजी डोबाळे यांनी देश सेवेकरिता सैन्यामध्ये जवळपास एकूण 34 वर्षे सेवा दिली. १९९४ ते १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलं. अखंड आणि अविरतपणे देश सेवा केल्यानंतर व आता आरंभ ऑर्गनायझेशन च्या माध्यमातुन पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रा सह विदर्भा मध्ये सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय असं कार्य केल्याबद्दल आणि करत असल्या बद्दल त्यांना उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.
आता पर्यंत व या पुर्वि त्यांना कॅप्टन, कमांडो, बॉडीगार्ड, अभियंता , व योग शिक्षक असे संबोधल्या जात होते आता त्यांना ” डॉक्टर ” असेही संबोधल्या जाईल ही बाब आनंदाची व प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे कॅप्टन सुनील डोबाळे यांचं विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close