क्राइम

गोळीबाराच्या घटनेने राजधानी हादरली 

Spread the love

नवीदिल्ली  / नवप्रहार मीडिया 

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली. नॉर्थ ईस्ट दिल्लीत शनिवारी सायंकाळी दोघांवर अज्ञातांकडून बेछूट गोळीबार केला गेला. २० ते २१ राउंड फायर करण्यात आले. या गोळीबारात अरबाज नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार आबिद गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आबिदला सुरुवातीला एका रुग्णालयात दाखल केले होते. तिथून त्याला जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अरबाज आणि आबिद यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ९ च्या सुारास ही घटना घडली. अरबाज आणि आबिद यांच्यावर अज्ञातांनी अचानक गोळीबार केला.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळावर १० रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासलं. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स एक्ट प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस उपायुक्त म्हणाले की, हत्येचा गुन्हा दाखल केला जात आहे. अरबाजवर अनेक गुन्हे दाखल होते. आबिदच्या रेकॉर्डची चौकशी केली जात आहे. शूटरची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले जात आहे. गँगवॉरची शंकाही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close