सामाजिक

ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद बोचरे यांच्या “कान्होला” चारोळी संग्रहाचे प्रकाशन

Spread the love

 

पातुर तालुका प्रतिनिधी

पातुर येथील ज्येष्ठ साहित्यिक परमहंस पुंडलिक महाराज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष लेखक, कवी आमचे पी.एम. उर्फ प्रल्हाद बोचरे यांच्या “कान्होला” या चारोळी संग्रहाचे प्रकाशन
28 जुलै 2024 रोजी करण्यात आले
पातूर येथील संत श्री सिदाजी महाराज संस्थान कार्यालय सभागृह येथे या कार्यक्रमचे अयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष
माजी आमदार लक्ष्मणराव तायडे होते तर अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीरामजी बोबडे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक ज्येष्ठ साहित्यिक देवानंद गहिले
यांची यावेळी मंचावर उपस्थित होती
सन 2022 मध्ये प्रल्हाद बोचरे यांचे आत्मचरित्रपर आमचे पीएम, सन 2023 मध्ये “गिल्ली मिसळ” व सन 2024 मध्ये “कान्होला” चारोळी संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे
यामधे सामाजिक जीवन शैली मानवी जीवनातील वास्तव माणसातील माणूसपण नैसर्गिक, वने, प्राणी, पशुपक्षी यांचे तसेच व्रूक्ष संवर्धन, शेती अशा सर्व सामाजिक विषयावर अतिशय सोप्या व समर्पित भाषेत त्यांनी लिखाण केले आहे लिखाणात लय गेयता व यमक साधून वाचकांना आकर्षित केले आहे
असे विचार यावेळी उपस्थित हिम्मत ढाळे, देवानंद गहिले, तुळशीरामजी बोबडे या मान्यवरांनी कान्होला या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनासंदर्भात व्यक्त करून प्रल्हाद बोचरे यांना साहित्य प्रवासाकरता शुभेच्छा दिल्यात
संगीत शिक्षक सुधाकर उगले गुरुजी
यांच्या संगीत व गीत गायनाची साथ मिळाली प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून चारोळी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
झाला त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये हिम्मतराव ढाळे यांचे हास्य कवि सम्मेलन तसेच गीत गायनामध्ये देविदास नीलखन तर अंकुर साहित्य संघाचे पातूर तालुका सचिव प्रा. विठोबा गवई यांनी “महागाईचे वारे” या कवितेने सुरुवात केली , प्रा. मुकुंद कवळकार, छोटू भाऊ जोशी, शंकर गाडगे, नंदकिशोर ठक, दिनकर बोदडे यांनी कविता सादर केल्या तर गीतांचे गायन देवानंद गहिले, तुळशीरामजी बोबडे यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेकानंद सावत सूत्रसंचालन श्री बी. एस.वानखडे साईबाबा विद्यालय बोडखा यांनी केले तर मनोगत व चारोळी वाचन श्री. रवींद्र चांदणे सरांनी केले आणि
अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी साहित्य संस्कृती जपुन साहित्याची निर्मिती साहित्यिकांनी करीत राहावे व्यक्त करून मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन श्री प्रदीप पोटदुखे सर यांनी केले
यावेळी कार्यक्रमाकरिता गणेश बोचरे,
प्रा. करुणा गवई, सौ निकिता गणेश राव बोचरे, सुखनंदन बोचरे, भारतीताई गाडगे, सौ. रुक्मिनाबाई उगले,सौ. दर्शना इंगळे, अमोल उगले, बाळासाहेब सरनाईक, सुभाष चूनडे, आनंद घोडे, खरप सर, अढाऊ सर, गोविंदराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दौलतराव घुगे प्रल्हाद खोकले, मनोहर फुलारी, प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोटदुखे सर, सुनील जाधव सर, रवींद्र चांदणे सर, बी एस वानखडे सर, सरदार मॅडम, श्रद्धा मेहरे, निखिल भिंगे, गजानन काळबांडे, मनोहर कराळे, शंकर शेगोकर, श्रीकृष्ण गोळे, बासव बोचरे, अक्षाली बोचरे यांच्यासह परमहंस पुंडलिक महाराज शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक यांनी अथक प्रयत्न केले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close