क्राइम

बायको माहेरी गेलेली त्याने प्रेयसीला घरी बोलवलं आणि केला भलताच कांड 

Spread the love

विशाखापट्टणम / विशेष प्रतिनिधी

पत्नी माहेरी गेल्याने त्याने प्रेयसीला घरी बोलावले. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे त्याने चाकूने वार करत तिची हत्या केली.आणि शरीराचे अनेक तुकडे करत ते फ्रीज मध्ये लपवून ठेवले. तर काही अवयव पिशवीत भरून ते सुनसान जागी टाकले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पण नेमकी हत्या कुठल्या कारणाने झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही. या घटनेने श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे.

रवींद्र हा मूळचा आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील ‘राजम’ येथील रहिवासी असून, सध्या तो विशाखापट्टणममधील गाजुवाका येथे राहत होता. आरोपीचे मृत महिलेशी अनैतिक संबंध होते.

विशाखापट्टणममधील ३५ वर्षीय रवींद्र हा नौदलात टेक्निशियन आहे. विवाहित असूनही, २९ वर्षीय मोनिकाशी अनैतिक संबंध होते. मोनिका ही विशाखापट्टणमची रहिवासी होती, तर रवींद्र हा मूळचा आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील राजम येथील असून, सध्या तो विशाखापट्टणममधील गाजुवाका (एलव्ही नगर) येथे राहत होता.

ही घटना नेमकी कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रची पत्नी काही आठवड्यांपूर्वीच तिच्या माहेरी विजयनगरम येथे गेली होती. रविवारी दुपारी, रविंद्रने मोनिकाला आपल्या घरी बोलावले. ते दोघे अनेक तास घरात होते. संध्याकाळच्या त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात, रविंद्रने मोनिकावर चाकूने वार करून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने मोनिकाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्याने मृतदेहाचे काही अवयव पिशव्यांमध्ये भरले आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी नेऊन टाकले; तर उर्वरित अवयव त्याने आपल्याच घरातील रेफ्रिजरेटरमध्ये लपवून ठेवले.

गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?

रवींद्र स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, तेव्हा या हत्येचे प्रकरण उघडकीस आले. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरात आणि रेफ्रिजरेटरमध्ये शरीराचे छिन्नविछिन्न अवयव आढळून आले. घराच्या झडतीदरम्यान, मृत व्यक्तीचे शिर मात्र पोलिसांना सापडले नाही. आरोपीने शिर दुसऱ्याच एखाद्या ठिकाणी विल्हेवाटीस लावले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

इतर अवयवांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता पोलीस त्या दोन व्यक्तींमधील वादाचे स्वरूप नेमके काय होते आणि ही हत्या पूर्वनियोजित होती की नाही,याचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close