कुंभारी तलाव येथे पक्षी कट्ट्या तर्फे पक्षीनिरीक्षण
अकोला / प्रतिनिधी
आज रोजी महाराष्ट्र पक्षीमित्र, निसर्ग कट्टा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षीकट्टा या उपक्रमा अंतर्गत कुंभारी तलाव अकोला येथे झालेल्या पक्षीनिरीक्षण कार्यक्रमात एकूण 36 पक्षांची नोंद घेण्यात आली ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रेलॅग गुज, एशियन स्पून बिल तसेच परदेशातून स्थानांतरित झालेल्या बदक प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली. सदर नोंद इ बर्ड या अॅप मध्ये नोंदविण्यात आली. कार्यक्रमाला पक्षी निरीक्षक म्हणून सामाजिक वनीकरण विभाग अकोल्याचे विभागीय वनाधिकारी श्री महेश खोरे, अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे, रालतो विज्ञान महाविद्यालय अकोल्याचे डॉ. हरीश मालपाणी, सौ टीना मालपाणी तसेच निसर्ग कट्ट्याचे सदस्य व आयोजक डॉ. अमृता शिरभाते, श्री मनोज लेखनार सौ लेखनार ताई, गुलाम नबी आझाद येथील पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी श्रेयस मोहरील, जिलानी कागदी, योगेश साखरे व इतर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ड्रोन द्वारे तलावाची चित्रफीत घेण्यात आली. पक्षी निरीक्षण कार्यक्रमाच्या अखेरीस अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्र पक्षीमित्र चे समन्वयक डॉ. मिलिंद शिरभाते यांनी आभार मानले.