Uncategorized

व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या बाजूला झोपलेल्या पत्नीला काहीच माहिती नाही 

Spread the love

गोरखपूर /  प्रतिनिधी

             गोरखपूर (उ. प्र.) येथे एक अजबगजब प्रकरण समोर.आले आहे. येथे रात्री घरात झोपलेल्या व्यापाऱ्याला गोळ्या झाडून ठार करण्यात आले आहे.मुन्ना साहनी (वय 52) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा त्याची पत्नी त्याच्या बाजूला झोपली होती.पण तिलाही या बद्दल कळले नाही. पोलिसांना तपासाला सुरवात केली आहे.

अधिकची माहिती अशी की, हसतमुख व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा मुन्ना साहनी (वय 52) याच्या पाठीत गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. माहिती मिळताच एसएसपी, एसपी साउथ आणि सीओसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, सखोल तपास सुरू केला आहे.

पतीला गोळी लागल्याचं समजताच पत्नीची झोप उडाली

अधिकची माहिती अशी की, पतीला गोळी लागल्यानंतर पत्नीची झोप उडाली. परंतु तिने कोणालाही येताना किंवा जातीना पाहिले नाही. तिने टॉर्च लावल्यावर मुन्नाला मरणासन्न अवस्थेत पाहिले आणि ओरडून शेजारील लोकांना बोलावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुन्ना ला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.

परिवाराने सांगितले की, मुन्ना साहनी हा अत्यंत हसतमुख व्यक्ती होता. त्याचं कोणाशीही वैर नव्हतं. त्याची जूस विक्रीची दुकान नेहमी गर्दीने भरलेली असायची. अशा व्यक्तीची अचानक हत्या झाल्यामुळे संपूर्ण गावात आश्चर्याचे वातावरण आहे. घटनास्थळी एसएसपी राज करन नय्यर आणि एसपी दक्षिणी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी साक्षीदार गोळा करणे सुरू केले असून, हत्या करण्यामागील कारणे आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे. तपासात परिसरातील लोक आणि मृतकाच्या परिवारातील सदस्यांची सखोल चौकशी केली जात आहे.

स्थानिकांनी म्हटले की, मुन्ना साहनी आपल्या गावात लोकप्रिय आणि विश्वासार्ह व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूनंतर गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून, हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या हत्येचं खरं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते, या प्रकरणात पूर्व नियोजित किंवा वैयक्तिक वैर असण्याची शक्यता लक्षात घेण्यात येत आहे. घटनास्थळावरून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र आणि इतर पुरावे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षात्मक उपाययोजना वाढवल्या असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी संपूर्ण बांसगांव परिसरात तपास सुरू ठेवला आहे. तपास पुढील काही दिवसांत या हत्येच्या तपासाची पूर्ण माहिती सामायिक केली जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close