विशेष

माणुसकी जिवंत असल्याचा आला अनुभव 

Spread the love
पान टपरी चालकाच्या मदतीमुळे वाचले दुचाकी स्वाराचे प्राण
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा ते पवनी मुख्य मार्गावर पहेला येथे राजू टिकाराम चवळे यांची   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दुकान असून भंडाऱ्याकडून लाखांदूर कडे जात असलेल्या अनोळखी व्यक्तीचा दिनांक 1 फरवरी 2023 ला नेताजी दरवे लाखांदूर यांचा कुत्रा आडवा आल्यामुळे यांच्या मोटरसायकलचा अपघात सायंकाळी  7 वाजेच्या सुमारास पहेला येथील पुलाजवळ झाला. ही माहिती व्यायाम करून येणाऱ्या मुलांनी राजूभाऊ चवळे यांना कळविताच त्यांनी तात्काळ आपले पान टपरी चे दुकान सोडून तात्काळ पहेला येथील पुलाजवळ धाव घेतली व त्वरित ॲम्बुलन्स बोलावून त्या व्यक्तीला स्वतः अंबुलन्स मध्ये बसवून न्यू लाइफ हॉस्पिटल भंडारा येथे भरती केले . तेव्हा सदर व्यक्ती कोणत्याही प्रकारे शुद्धीवर नव्हते.  त्यांच्या गाडीवर ठेवलेली पिशवी तपासणी केली असता त्यांच्या गाडीतून त्यांचे कागदपत्र हाती मिळाले. त्यावरून त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांचे कुटुंब रात्री दहा वाजे दवाखान्यात पोहोचले. तोपर्यंत राजू चवळे यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनी 2 ऑक्टोंबर  2023 ला  राजू चवळे यांच्या प्रत्यक्ष घरी भेट देऊन  त्यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व रोख रक्कम अडीच हजार देऊन सत्कार केला .त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,पत्रकार
कुलदीप गंधे व सामाजिक कार्यकर्ते विलास बांडेबुचे  यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close