घाटंजीत दूर्गामता विसर्जन मिरवणूक शांततेत पार.

मिरवणुकीत आठोडी बाजार मोठी देवीतील हनुमान सेना देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजीत नवरात्री उत्सवाच्या विसर्जनाच्या उत्साहात विविध सांगित विद्याने धूम ठोकली डोंगररांग,भिलाई,चंद्रपूर,नागपूर, सह ईतर मोठ्या व दूरच्या ब्याजिंओ विद्याने घाटंजीत आवाजाचा सुरू काढला त्यात नाचणाऱ्यानी मनसोक्त आनंद घेतला.विसर्जनामधे जय बजरंग सेवादल आखाडा सार्वजनिक दूर्गाउत्सव मंडळा व्दारा आलेल्या वानर सेना व महाकाली, कंदील लाईट देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. विसर्जन मिरवणूक सायंकाळी 6 चे सूमरास मुख्य मार्गावर एकापाठोपाठ एक असे विविध प्रकारचे वाद्य वाजवत निघाली व शांततेत पार पडली. घाटंजी पोलीस प्रशासनाने या विसर्जन काळात चौक पोलिस बंदोबस्त ठेवला होता त्यासाठी घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर, साह्यक सिडाम,खाडे, नागरगोजे,खंडागळे,वामन जाधव ,महीला पोलिस जुनघरे, जाधव, ट्राफीक सेवक कलीम व इतरही पोलिस कर्मचारी होमगार्ड यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडली जावी यासाठी मेहनत घेत कार्य बजावले त्यास विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली जाई याकरिता मंडळ पदाधिकारी व जनतेकडून ही सहकार्य लाभले.