क्राइम

बंटी जहागिरदार यांचेवर गोळीबार , उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

श्रीरामपूर / विशेष प्रतिनिधी

श्रीरामपूर येथील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याची हत्या झाली आहे. भर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटी जहागिरदारला गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर जहागिरदारला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

श्रीरामपूर येथे कब्रस्तानातून बाहेर पडल्यानंतर बंटी जहागिरदारवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहागिरदारवर कब्रस्तानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेकांनी हल्लेखोरांची व्हिडिओ देखील बनवल्याचं दिसत आहे. गोळीबार झाल्यानंतर परिसरात पळापळ सुरू झाली.

गोळीबाराच्या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात बंटी जहागीरदार याचा नाव होतं. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट झाले नाहीये. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तेथून काडतुसे गोळा करण्यात आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पाच टीम रवाना करण्यात आली आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close