क्राइम

बैलगाडा शर्यतीत दोन गटात राडा ; गोळीबार 

Spread the love

पनवेल / नवप्रहार मीडिया 

                  राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण बघता गुन्हेगारांवर कायद्याचा अंकुश नसून त्यांना कायद्याची भीती वाटत नसल्याचे दिसून येत आहे. खून ,बलात्कार  गोळीबार या सामान्य घटना झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच पनवेल येथे बैलगाडा शर्यतीत झालेल्या पराभवानंतर दोन गटात राडा झाला.त्यातील एका गटाच्या समर्थकाने गोळीबार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.

पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या गोळीबार प्रकरणी राहूल पाटील याच्या विरोधात गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 12 तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेवटची लढत ही कल्याण मधील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली. अंतिम लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला. जिंकलेल्या गटाने आनंदात गुलालाची उधळण केली. मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला.

राहुल पाटील याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला. दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली. त्यात राहुल पाटील यांनी त्याच्या सोबत जमवलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूल मधून एक राऊंड फायर केला. घटनास्थळी पोलिसांनी तपासली केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर 15 ते 20 जणांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 336,294,141 व इतर कलामसह गुन्हा दाखल झाला असून,पोलीस अधिक तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close