क्राइम

बुलढाणा जिल्हा हादरला; दरोडेखोरांकडून डॉक्टर दाम्पत्याला मारहाण , महिलेचा मृत्यू 

Spread the love

बुलढाणा  / विशेष प्रतिनिधी 

                       डॉक्टर दाम्पत्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्पत्याला मारहाण केल्याने यात डॉक्टर पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर पती गंभीर जखमी झाले आहेत. घटना मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे घडली आहे.  या घटणेमुळे दाभाडी गावासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मारहाणीत महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

पुढे आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण केली. ज्यात डॉ.माधुरी टेकाडे यांचा जागीच मृत्यू झालाय. तर या हल्ल्यामध्ये गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या डॉ. गजानन टेकाडे यांच्यावर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई करत या दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. मात्र जिल्ह्यात अलीकडच्या काळात लुटमार, दरोड्याच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close