युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे अपघाती बिमा धनादेश वाटप
जवाहरनगर :- विविध बँके कडून ग्राहकांना अनेक सामाजिक दायित्व च्या योजना राबविल्या जातात त्यातील एक योजना म्हणजे ए. टी. एम. कार्ड अपघाती संरक्षण बिमा योजना, या योजनेच्या अंतर्गत जर ग्राहकाने ४५ दिवसाच्याआत ए. टी. एम.
द्वारे रोख व्यवहार केले असल्यास जर त्याचे अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाखाचे सरंक्षण बिनमूल्य देण्यात येते,
सागर भुरे यांचा अपघाती मृत्यू झाले होते , त्याचे वारस पत्नी श्रीमती काजल भुरे यांनी सर्व गरजेनुसार कागदपत्र देऊन बिमा ची मागणी केली, यात युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भंडारा ने तत्परता दाखवत आपल्या वरिष्ठ कार्यालयशी संपर्क करून दिनांक २ जानेवारी ला श्रीमती काजल भुरे ह्यांना दोन लाखाचे धनादेश देण्यात आले,
धनादेश वाटप प्रसंगी श्रीमती काजल भुरे, बँक व्यवस्थापक मुकेश देवांगण , सह व्यवस्थापक अमेय परांजपे, प्रतीक वैध , बँक स्टाफ आणि सम्मानिय ग्राहकगण उपस्थित होते.
………………..