बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचे उगमस्थान —- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) -महाकारुणी तथागत भगवान गौतम बुध्दांनी अडीच हजार वर्षा पूर्वी भारतात सर्वप्रथम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जगाला लोकशाहीचा मुलमंत्र दिला.संपूर्ण जगाला लोकशाहीचा विचार बौध्द धम्मानेच दिला आहे.विश्वशांती,अहिंसा,समता,विश्वबंधुतत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बौध्दधम्मानेच जगाला दिले आहे.जगात अनेक ठिकाणी युध्दजन्य स्थिती आहे.युध्दाच्या रक्तपाता पासुन जगाला वाचवण्यासाठि आजही जगाला भगवान बुध्दाच्या विचारांची गरज आहे.बौध्दधम्म सर्व मानवजातीसाठी आदर्श जीवन मार्ग आहे.असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 2586 व्या बुध्द पौर्णिमे निमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्या दि.23 मे रोजी बुध्द पौर्णिमे निमित्त सारनाथ येथील धम्मेक स्तुप येथे 2586 व्या बुध्द पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या बुध्द जयंती महोत्सवात ना.रामदास आठवले उपस्थीत राहणार आहेत. माणसांच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरु असते.सर्व क्रिया आणि क्रांतीचे मन हेच केंद्र आहे.मनावर विजय मिळविला तर माणुस जगावर विजय मिळवू शकतो.मनावर विजय मिळविण्यासाठी विपश्यनेचा मार्ग भगवान बुध्दांनी जगाला दिला आहे.भगवान बुध्दांचा विचार हा संपूर्ण मानव जातीचा उध्दार करणारा विचार आहे.बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्दधम्माची दिक्षा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे.असे ना. रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.