नरेंद्र पहाडे यांच्या सहकार्याने उजळली वंचितांची दिवाळी
गरजू कुटुंबांना किराणा साहित्य, मिठाईचे वाटप
पवनी / प्रतिनिधी
प्रकाशाचा सण दीपावली सर्वत्र पारंपरिक उत्साहाने साजरा होत आहे. यादरम्यान समाजातील गरीब कुटुंब, निराधार मात्र या आनंदापासून दूर असतात. या सर्वांना दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी पवनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन युवा गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष नरेंद्र पहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबांना किराणा साहित्य, मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मांगली ग्रा. पं. सदस्य चेतन पडोळे, चंदू पडोळे, विकास वैद्य, सोनू पडोळे, रामरतन पडोळे युवा गर्जना प्रतिष्ठानचे पवनी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील गावागावात राहणाऱ्या गरजू नागरिकांच्या घरात दिवाळीचा सण आनंदाने साजरा झाला. या उपक्रमाच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. दिवाळीचा आनंद अधिक आनंददायी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला असल्याचे एक सामाजिक वसा जपण्याचे काम सातत्याने सुरू असून पुढेही सुरू राहील असे अध्यक्ष नरेंद्र पहाडे यांनी सांगितले.
0000