क्राइम

शाखा अभियंता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
                     घर घर जोडणी अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचे बिल काढण्या करिता लाच मागणाऱ्या शाखा अभियंत्यास ACB ने लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. देवेंद्र मधुकर खैरनार, असे त्याचे नाव असून तो ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत कार्यरत आहे.
                  शासनाच्या घर घर जोडणी अभियाना अंतर्गत धारणी तालुक्यातील धोदरा गावात काम करणाऱ्या कंत्राटदाराने केलेल्या कामाचे मोजमाप करण्यासाठी आणि त्याची एमबी बनवून ती मजूर करण्यासाठी तक्रारदार याने शाखा अभियंता खैरनार यांना विनंती केली होती. यासाठी देवेंद्र मधुकर खैरनार, शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी यांनी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती .
                तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत ACB कडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२७/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी येथील शाखा अभियंता श्री. देवेंद्र मधुकर खैरनार यांनी मौजे धोदरा गावातील घर घर जोडणी योजने अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे एम.बी बुक मंजुर करण्यासाठी व मेजरमेंट करुन बिल मंजुरीसाठी ५०,०००/- रु. लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले वरुन दिनांक २७/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक श्री देवेंद्र मधुकर खैरनार, वय-३६ वर्ष, शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग धारणी जिल्हा परीषद अमरावती यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम . ५०,०००/- रु. पंचासमक्ष स्विकारली वरुन आज रोजी वर नमुद आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले
           सदरची कारवाई  मारुती जगताप,
 पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
श्देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
 शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, यांच्या मार्गदर्शनात
 तपास अधिकारी  पो. नि. केतन मांजरे ला.प्र.विभाग,अमरावती यांनी केली.
या कारवाईत  केतन मांजरे,पोलीस निरीक्षक,अमरावती  , पो.नि.चित्रा मेसरे, अमरावती,  पो.नि.विजया पंधरे,अमरावती,
पो. कॉ.आशिष जांभोळे, पो. कॉ. शैलेश कडु,
पो.ना. रितेश राठोड, पो. कॉ.उमेश भोपते
पोउपनि सतिश किटूकले,  पो. कॉ. स्वप्नील क्षिरसागर  यांनी सहभाग घेतला.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close