निवड / नियुक्ती / सुयश

शेंदुरजनाघाट साठी गौरवास्पद बाब ; दोन युवक अग्निवीर दलात

Spread the love

वरुड / दिनेश मुळे

शेंदुरजनाघाट येथील दोन युवकाची इंडियन आर्मी (अग्नीवीर) मध्ये प्रथमच नुकतीच निवड झाली आहे. विकास मारोतराव ढोके (१८) व भावेश नरेंद्रराव वानखडे (२०) अशी या युवकाची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील संरक्षण मंत्री सदस्यांनी २०२२ मध्ये इंडियन आर्मी (अग्निवीर) ची भर्ती प्रक्रीया राबवून युवकांना रोजगार उपलब्ध करून सशस्त्र देश सेवेची संधी देण्याची घोषना केली होती.या बाबत फेब्रुवारी २०२३ मध्ये भर्ती प्रक्रीया सुरू करण्यासाठी फार्म भरण्यात आले. या साठी एप्रील महिन्यात अमरावती शहरातील बीझीलॅन्ड येथे आभासी पध्दतीने पेपर घेण्यात आले होते.याचा निकाल २० मे २०२३ ला लागला असता यात या दोन्ही युवकाचा समावेश होता. तेथुन २० दिवसाच्या कालावधी नंतर लगेच १३ जुन ला रात्री २.१५ वाजता नागपुर येथील मनकापुर स्टेडीयमवर यांची शारीरीक चाचणी पार पडली तर १५ जुन ला वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. दि.१८ सप्टेंबर ला मिरीट लिस्ट प्रकाशीत करण्यात आली होती. त्या मध्ये या दोन्ही युवकाची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी नागपुर येथे ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या आरटीलरी ट्रेनिंग करिता दोघांना ही वेगवेगळे शहर देण्यात आले आहे. भावेश वानखडे याला नासिक देण्यात आले आहे तर विकास ढोके याला मध्यप्रदेश मधील जबलपुर येथील महाररेझीमेंट सागर देण्यात आले आहे.

 

देशसेवेची संधी गौरवाची बाब

इंडियन आर्मी अग्निवीर माझी निवड झाली. मी ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत मी वाढलो त्या मातीचे ॠण फेडण्याची व देश सेवा करण्याचीसंधी मला प्राप्त झाली याचा मला अभिमान आहे.अशी प्रतिक्रिया विलास ढोके यांनी दिली.

 

भावेश वानखडे प्रतिक्रिया देताना म्हणाले प्रत्येकांवर जशी कुंटुबाची जबाबदारी आहे तशीच जबाबदारी आपल्या देशाच्या रक्षणाची सुद्धा आहे हे विसरून चालणार नाही. इंडियन आर्मी अग्निवीर म्हणुन माझी निवड झाली व त्यामुळे मला देशसेवा करण्याची संधी प्राप्त झाली ही माझासाठी व माझा कुंटुबासाठी गौरवाची बाब आहे.

काय आहे अग्नीवीर योजना

भारतीय सैन्यदलात अग्नीपथ या योजने मध्ये १७ ते २१ वयो गटातील भारतीय युवकांना ४ वर्षाकरिता सैन्यदलात सशस्त्र देश सेवेकरिता संधी देण्यात येणार आहे. या मध्ये महिलांचा ही समावेश राहणार आहे.या योजनेतून युवकांना पहिले ३ वर्ष दरमहा ३० हजार व चौथ्या वर्षी ४० हजार प्रतीमहिना पॅकेज दिले जाईल. ४ वर्ष पुर्ण केलेल्या युवकांपैकी २५% युवकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सेवेत कायम केले जाईल. ४ वर्ष पुर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी सेवा निधी या सर्वसमावेशक आर्थिक पॅकेज ची तरतुद केली जाईल.या योजनेत पेंशन नाही पन एकरकमी पैसे दिले जातील.त्याच बरोबर अग्नीस्किल प्रमाणपत्र दिले जातील जे पुढील नौकरीसाठी उपयोगी ठरेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close