हटके

पत्नीचे ते रूप पाहून पतीने घेतली पोलिसात धाव 

Spread the love

लखनऊ  / नवप्रहार डेस्क 

                    सहसा लग्नानंतर पत्नीला पतीच्या व्यसना बद्दल कळते. तेव्हा त्यांच्यात त्या विषयाला घेऊन खटके उडू लागतात. पत्नी पत्नी दारू सोडावी यासाठी त्याला समजवत असते. पण पत्नीचं जर व्यसनी असेल तर मग पतीने काय करावे असा प्रश्न उपस्थित होतो. पत्नीच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने पोलिसात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

आग्रा येथील सदर भागात राहणाऱ्या या तरुणीचं मार्च २०२४ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर पत्नी सासरच्या घरी पोहोचली तेव्हा एके दिवशी पतीने तिला नशेत पकडलं. पतीने आधी पत्नीला व्यसन न करण्यास सांगितलं. पण तिने ऐकलं नाही. यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. पतीने सांगूनही जेव्हा पत्नीने हे व्यसन थांबवलं नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं.

आता समुपदेशकांनी पती-पत्नी दोघांना बोलावलं, जिथे दोघांनी एकमेकांवर आरोप केले. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पतीने तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडल्याचं पत्नीचं म्हणणं आहे. सध्या समुपदेशकांनी दोघांनाही पुढील तारीख दिली आहे.

समुपदेशकाने सांगितलं की, लग्नाच्या दोन महिन्यांनंतर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आला. नवऱ्याने नववधूला तिच्या आई-वडिलांच्या घरी सोडलं आणि तिला सोबत ठेवलं नाही. त्याची एकच अट आहे की त्याच्या पत्नीने तिचं व्यसन सोडावं. व्यसन सोडल्याशिवाय तो तिला घरी नेणार नाही. नववधूला समजवण्यासाठी समुपदेशनही करण्यात आलं आहे. वधू आपली सवय सोडायला तयार नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close