शेगाव येथील अधिवेशनातील आश्वासनाचे पुर्तेतेसाठी बारी समाज शिष्ट मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांची भेट
मुंबई येथे बैठक घेउन सकारात्मक निर्णय घेऊ —– ना. फडणवीस
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
गेली दोन महिण्यापुर्वी १ आक्टोबर २०२३ ला संत नगरी शेगाव येथे अखिल भारतोय बारी समाजाचे न भूतो न भविषयतो समस्त बारी समाज बांधवांचे उपस्थितीत श्री संत शेगाव नगरीत अधिवेशन पार पडले ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्या दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते परंतु काही कारणास्तवं ते येऊ न शकल्या मुळे स्वतः उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणवीस ह्यांनी व्हिडीओ वर्चूवलं क्लिप द्वारे उपस्थित बारी समाज बांधवांना समाजाच्या असलेल्या मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अडीच महिने झाले असतांना सुद्धा त्या बाबीवर कोणतेही ठोस पाऊल उचल्ल्या न गेल्या मुळे तसेच हिवाळी अधिवेशनात सुद्धा ठोस निर्णय न लागल्याने राज्य भरातील बारी समाज व्यथित झाला आहे
त्यामूळे नुकतेच बारी समाजाचे शिष्ट मंडल विधान परिषदेचे आमदार प्रवीणजी दटके व माजी मंत्री आमदार डॉ संजयजी कूटे यांच्या माध्यमातून दी 19 डिंसेंबरला उपमुख्यमंत्री दे्वेंद्रजी फडणीस ह्यांची भेट घेतली व दि 1ऑक्टोबर रोजी शेगांव येथिल बारी समाज राष्टीय महा अधिवेशनातील आलेल्या लाखो बारी समाज बाधवाना सरकार तर्फे दे्वेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ वर्चुअल द्वारे दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करुण दिले
उपमुख्य मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आश्वासनाची आठवण करून बारी समाजाचे मागण्या पूर्तता बाबत विनंती केली असता त्यांचे सोबत सकारात्मक चर्चा करून येत्या काही दिवसातच मुंबई येथे बैठकीसाठी बोलावून आपल्या मागण्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करणार असल्याचे फडणवीस यांनी बारी उपस्थित बारी समाज बांधवांना आश्वासन दिले
बारी समाजा चे संत रूपलाल महाराज यांचे स्मारक व त्यासाठी जागा, राष्ट्रसंतांचा दर्जा व बारी समाज आर्थिक विकास महा मंडलाची स्थापना करने, नागवेली पान व पानप्रिपी चा पिकविम्यात समावेष करुन त्याला अनुदान आदी मागण्या घेऊन बारी समाजाचे शिष्ठमंडळ
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन स्थळी सर्वजण एकत्र आले होते
या सर्व नियोजनामध्ये राज्यातील काही प्रमुख समाज बांधवांचा सहभाग होता ह्याबाबत सरकार बारी समाजाप्रती काय भूमिका घेणार ह्याकडे सर्व समाज बांधवांचे लक्ष लागले आहे