Uncategorized

बनावट चकमक प्रकरणी दोन पोलिसांना अटक 

Spread the love
बनावट चकमक प्रकरणी दोन पोलिसांना अटक 
 

मुंबई / नवप्रहार मीडिया 

                      नालासोपारा पोलिसांनी ज्या आरोपीला चकमकीत ठार केले असे वरिष्ठांना सांगितले होते ती चकमक बनावट असल्याचे विशेष गापास पथकाच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे या चकमकीत सहभाग असलेल्या सोन पोलिसांना अटक केली आहे. मृतकाच्या भावाने उच्च न्यायालयात दाद मागितल्या नंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही चौकशी कर यात आली होती. 
शनिवारी दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कॉन्स्टेबल मंगेश चव्हाण आणि पोलीस अधिकारी मनोज सकपाळ अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ही कथित बनावट चकमक 2018 साली घडली आहे.

एसआयटीने दोन्ही पोलिसांना मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले. दोघांना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तुळींज पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने योग्य तपास होत नसल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला होता.
एसआयटीच्या तपासावर खंडपीठाला समाधान
2018 मध्ये ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने योग्य तपास न केल्याबद्दल खंडपीठाने आक्षेप घेतला होता. अनेक चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी जोगिंदर राणा याच्या कथित बनावट चकमकीचा तपास करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
काय आहे प्रकरण?
2018 मध्ये नालासोपारा येथे सराईत गुन्हेगार जोगिंदर राणा याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र, ही चकमक बनावट असल्याचा आरोप मयत जोगिंदर राणा याचा भाऊ सुरेंद्र राणा याने केला होता. स्थानिक पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे सुरेंद्र राणा यांनी मुंबई हायकोर्टाकडे न्याय मागितला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. 2023 मध्ये या प्रकरणात मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यांच्यावर कोणतीही अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, शुक्रवारी हायकोर्टाने या प्रकरणी पोलिसांवर ताशेरे ओढले. त्यामुळे शनिवारी तातडीने कारवाई करत चव्हाण आणि सकपाळ या दोघांना अटक केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close