क्राइम

शेतमालकला आलेल्या फोन मुळे तो ईतका भयभीत होतो की सरळ पोलीस ठाणे गाठतो.. वाचा काय आहे प्रकरण 

Spread the love

झुंझुनू  (राजस्थान )/ नवप्रहार मीडिया 

                राजस्थान च्या झुंझुन मध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. ज्यामुळे शेतमालक इतका घाबरला की सरळ तो पोलीस ठाण्यात पोहचला. त्याचे म्हणणे ऐकून पोलीस देखील चक्रावले. चला तर पाहू या असे काय होते त्या कॉल मध्ये.

                  घटना पिलानी क्षेत्रातील ढक्करवाल गावातील आहे. याठिकाणी रामपाल सिंह यांची शेती आहे. त्याच्या मुलगा अनिल च्या मोबाईल वर  एका अनोळखी नंबर वरुन कॉल येतो आणि कॉल करणारा त्याला सांगतो की तुमच्या शेतात एक लोखंडी पेटी असून त्यात मृतदेह आहे आणि त्यावर अंत्यसंस्कार करा. मुलाने जेव्हा रामपालसिंह यांना ही माहिती दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळेसाठी पोलीस देखील चक्रावले. पण त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना लोखंडी पेटीत एक।मृतदेह दिसला.

              पोलिसांनी जेव्हा रामपाल ला याविषयी विचारणा केली तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की सुरेश महिनाभरापूर्वी पश्चिम बंगालहून शेतीच्या कामासाठी इथं आला होता. सुरेश त्याची पत्नी आणि नातू सूर्यासोबत शेतात बनवलेल्या एका खोलीत राहत होता. सूर्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर त्याची आई त्याला सोडून गेली आहे. सूर्या हा त्याच्या आजी आजोबांसह राहायला होता. रविवारी संध्याकाळी सुरेश आणि त्याची पत्नी अचानक गायब झाली. पोलिसांकडून या जोडप्याचा शोध घेतला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close