सामाजिक

दोन चिमुकल्यांच्या  निधनाने विरुळ वासी हळहळले 

Spread the love
दोन चिमुकल्यावर उपचार सुरू : मृत्यूचे कारण अज्ञात 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
तालुक्यातील विरुळ रोंघे येथील रहिवासी साव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील दोघा भावांच्या दोन मुलींचा अज्ञात कारणाने मृत्यू झाला आहे. तर दोन चिमुकल्यांवर उपचार सुरू आहेत. या दोन बहिणींच्या मृत्यू मागील शोध घेण्यासाठी पोलीस, आरोग्य आणि महसूल प्रशासनाणे घटनास्थळी भेट दिली आहे.
विरुळ रोंघे येथिल प्रविन साव यांची मुलगी कु.नंदीनी साव वय 10 वर्ष व राजेश साव यांची मुलगी कु.चैताली साव वय 11 वर्ष ह्या दोन्ही मुलीचे आज पहाटे अचानक  निधन झाले . साव कुटुंबातील  चि.देवाश राजेश साव व चि.भक्ती प्रविन साव यांच्यावर धामणगाव रेल्वे येथे डॉ अप्तुरकर यांच्या कडे उपचार चालु आहे
या  घटननेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.  घटनेनंतर  पोलीस स्टेशन आरोग्य विभाग महसुल विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली .  अचानक घडलेल्या या दुःखद घटनेने  साव कुटुंबा सहीत संपुर्ण विरुळ गाव दुःखात बुडाले आहे .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close