क्राइम

हत्येच्या आरोपीला 12 तासात अटक ; बोरिवली पोलिसांची कारवाई

Spread the love

प्रेमसबंधाच्या रागातून झाली होती हत्या

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

             प्रेमप्रकरणाच्या रागातून झालेल्या हत्येचाफक्त 12 तासात छडा लावून बोरीवली पोलिसांनी खुन्याला बेड्या ठोकल्या आहेत. संदेश पाटील असे मृताचे तर छुट्टन साफीला  असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसारसंदेश हा मूळचा रायगड रहिवासी होता. एमकॉमचे शिक्षण झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला. तो नवी मुंबई येथे त्याच्या नातेवाईकांकडे राहत होता. संदेश हा जोगेश्वरी पूर्व येथे एका खासगी बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी संदेश हा नेहमीप्रमाणे कामावर गेला. रात्री तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला, मात्र त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे संदेशच्या नातेवाईकांनी त्याच्या ऑफिसमध्ये कॉल करून चौकशी केली.

रात्री संदेशच्या नातेवाईकांना जोगेश्वरी हार्बर लाईनच्या स्टेशन मास्तरने फोन केला. संदेश हा जोगेश्वरी रेल्वे स्थानक येथे जखमी अवस्थेत आढळून आल्याचे त्याना सांगण्यात आले. याची माहिती समजताच त्याचे नातेवाईक जोगेश्वरी रेल्वे स्थानक येथे गेले. त्यानंतर बोरिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी संदेशला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

संदेशच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक आयुक्त बाजीराव महाजन याच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम आणि पथकाने तपास सुरू केला. तपासासाठी पथक तयार केले होते. पोलिसांनी रेल्वे यार्ड येथील फुटेजची तपासणी केली. त्या एका फुटेजमध्ये छुट्टन दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी छुट्टनला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने हत्येची कबुली दिली.

भेटायला बोलावून घात केला

छुट्टन हा अंधेरी येथे एका बँकेच्या लोन विभागात काम करतो. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी त्या तरुणीचे आणि छुट्टनचे ब्रेक अप झाले. ब्रेक अप झाल्यावर ती संदेशच्या संपर्कात आली. तरुणीचे संदेशसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे समजताच छुट्टन संतापला. त्याने संदेशला जोगेश्वरी येथे भेटायला बोलावले. कारशेड येथे भेटल्यावर छुट्टने संदेशच्या डोक्यात दगड मारून त्या जखमी केले. संदेशची ओळख पटू नये म्हणून त्याने चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केला होता. कोणलाही संशय येऊ नये म्हणून छुट्टन संदेशला रेल्वे ट्रकजवळ टाकून त्याचा मोबाईल घेऊन पळून गेला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close