तहसिल कार्यालय घाटंजी येथे रक्तदान शिबीर संपन्न
रक्तदान सोबत मरणोत्तर अवयवदानचाही १० व्यग्तीचा संकल्प
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालय घाटंजी तसेच तालुका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते आज दि. ३०/०८/२०२३ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी रक्तदान बरोबरच मरनोत्तर अवयवदानाचा संकल्प देखिल करण्यात आला.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर याशनी नागराजन, घाटंजी तहसिलदार विजय साळवे,अप्पर तहसिलदार मोहनिश शेलवटर,न.प. मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी दिप प्रज्वलन व स्वतः: रक्तदान करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. या रक्तदान शिबीरात तालूका प्रशासनातील विवीध विभागातील अधिकारी, कर्मचारी,घाटंजी तालुक्यातील नागरीक,पोलीस पाटील यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.यावेळी रक्तसंकलनाकरीता श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढी चमू डॉ. मडावी यांचे मार्गदर्शनाखाली रक्तपेढी चम्मू उपस्थित होती व त्यांनी रक्तसंकलन केले. या रक्तदान शिबिरात एकूण ५९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याच कार्यक्रमात पुनर्जीवन फाऊंडेशन च्या वतीने मरनोत्तर अवयवदानाचा संकल्प करण्याकरीता अर्ज ही उपलब्ध करून देण्यात आले होते.यात दहा व्यक्तींनी शिबीरात मरनोत्तर अवयवदानाचा संकल्प केला. सामाजिक बांधिलकी व समाजात मोठ्या प्रमाणात रक्तदान आणी अवयवदान चळवळ उभी राहणे ही आजचे काळाची गरज जनतेच्या व दानशूर व्यक्ती यांच्या निर्दशनास येऊन गरजवंताला ‘रक्तदानातुन जीवनदान’ मिळावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.