हटके

डेटिंग ऍप्स च्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणारे रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात 

Spread the love

उत्तरप्रदेश / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

अँड्रॉईड मोबाईल आल्यापासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यात आता अनेक प्रकारचे डेटिंग ऍप्स आले आहेत. तरुण तरुणी , लग्न झालेले महिला – पुरुष या ऍप्स च्या माध्यमातून मनपसंद जोडीदाराशी गप्पा- गोष्टी ,हितगुज करू शकतो. पण म्हणतात न की आपल्या देशात कायदे बनण्यापूर्वी त्याच्या पळवाटा पाहिले बनतात. तसेच या डेटिंग ऍप्स च्या बाबतीत झाले आहे. वास्तविक पाहता या ऍप्स च्या माध्यमातून ओळख झाल्यावर त्या दोन व्यक्तींना एकमेकां प्रति  आवश्यक ती माहिती मिळावी हा त्या मागील उद्देश.पण काही लोकांनी या ऍप्सलाच आपल्या मिळकतीचे साधन बनवले आहे.

डेटिंग ऍप्स च्या माध्यमातून लोकांना गंडविणाऱ्या आणि  त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेट चा  र्पोलिसांनी   पर्दाफाश केला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून ही टोळी त्यांच्याकडून पैसे वसूल करत होती. डेटिंग अॅपच्या माध्यमातून ही टोळी तरुणांशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना घरी बोलावून त्यांचे जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवायची. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होती. पोलिसांकडे तक्रार केल्यास व्हिडिओ कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्याची धमकीही दिली जात होती.

8 ऑगस्टला उत्तर प्रदेश पोलिसांकडून एक तक्रार आली. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. पोलिसात तक्रार करणाऱ्या तरुणाला डेटिंग अॅपच्या माध्यमातून घरी बोलावण्यात आलं. त्यानतंर घरी असलेल्या तीन ते चार लोकांनी त्याला मारहाण केली. त्याला विवस्त्र करुन त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. पीडित तरुणाने हिम्मत करुन पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close