भाजपचे जेष्ठ व युवा संमेलन संपन्न
वरूड/तूषार अकर्ते
भाजप पक्षाच्या सुशासन आणि गरीब कल्याण मोदी @९ अंतर्गत आयोजित जेष्ठ कार्यकर्ता व संयुक्त मोर्चा संमेलन सोहळा वरूड मोर्शी मतदार संघाच्या वतीने दि.३० जुन रोज शुक्रवारला वरुड येथील अष्टविनायक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मोदी सरकारच्या यशस्वी ९ वर्षाच्या कार्यकाळाच्या निमित्याने भाजपा जेष्ठ कार्यकर्ता व संयुक्त मोर्चा संमेलन कार्यक्रम संपुर्ण देशभर संपन्न होत आहे. याच अनुषंगाने वरूड मोर्शी विधानसभा क्षेत्रात भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ता व संयुक्त मोर्चा संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, कार्यक्रमाचे उदघाटक खा.डॉ.अनिल बोंडे, प्रमुख उस्थितीमध्ये खा.रामदास तडस, आमदार डॉ.रामदास आंबटकर,
सुमित वानखडे, निवेदिता चौधरी, शिवराय कुलकर्णी हे होते. कार्यक्रमाचे आयोजक तसेच विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जेष्ठ कार्यकर्ता व संयुक्त मोर्चा अष्टविनायक सभागृहात पार पडला आहे.
या वेळी डॉ.अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कामगिरीचा आलेख मांडला. तसेच मतदार संघात विकासाची गंगोत्री आणायची असेल तर मोदी सरकारचा कसा फायदा करून घेता आला त्याचा मागोवा घेतला. बोंडे यांची उपस्थिती मेळाव्यासाठी प्रेरणादायी ठरली त्या मुळे भरगच्च गर्दी सुद्धा दिसुन आली. कार्यकर्ता हाच पक्षाचा श्वास असून त्याला अखेर पर्यंत जपणे आवश्यक आहे असे मत संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्त केले. खा.रामदास तडस यांनी पक्षाच्या सुशासन व गरीब कल्याण योजनाचा मागोवा घेत सबका साथ सबका विकास या साठी सबका विश्वास जिंकणे आवश्यक असून भाजप पक्ष जनतेचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाला आहे असे मत व्यक्त केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व आयोजक यांनी मोदी सरकारच्या सुशासनात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मानसन्मान ज्या पक्षात होतो तो पक्ष सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहचतो भाजपमध्ये ती परंपरा आजही जपली जात आहे त्यामुळेच भाजप आज जगात सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली घोडदौड कायम ठेवीत आहे. असे मत व्यक्त केले. मेळाव्यात महिलांची व युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सभागृह मध्ये बसण्याची व्यवस्था असूनही सभागृह भरगच्च भरल्यामुळे बरेच कार्यकर्ते बाहेरून आपल्या आवडत्या नेत्यांना ऐकण्यासाठी सज्ज होते. कार्यक्रमा दरम्यान २०० च्या वर पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष प्रवेश केला तसेच नवीन युवा वॉरियर्सच्या शाखेचे उद्घाटन इंदिरा चौक येथे करण्यात आले. या कार्यक्रम संमेलनामध्ये भाजप जेष्ठ कार्यकर्त्यांचा व युवकांचा यथोचित सन्मान उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन संजय खासबागे यांनी केले.
संमेलनाच्या यशस्वीते करिता भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, प्रदेश, जिल्हा ,पदाधिकारी, सर्व आघाडी, सेल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.