Uncategorized
भाजपाचे आदिवासी भागात घर चलो अभियान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती

नागपूर / प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या योजना अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहचिवण्यासाठी भाजपा आदिवासी-वनवासी भागातील ६० हजार घरापर्यंत पोहचणार आहोत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ते नागपूर येथे विचार परिवार व भाजपा संघटन बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. विचार परिवार व भाजपाच्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. आदिवासी आणि वनवासी भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सर्वांकडून माहिती घेणे व ती सरकारपर्यंत पोहचविणे हे आमचे काम आहे, असे सांगून आजच्या बैठकीचा कोणताही राजकीय संबंध नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवार-अदानी भेटीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार आणि गौतम अडानी यांचे कौटुंबिक संबंध आहेत, ते चांगले मित्र आहेत, राजकारणात व्यावासयिक मित्र असणे चुकीचे नाही. यात राजकारण होऊ नये. याबाबत शरद पवार यांनी विस्ताराने सांगितले असून त्यांनी शरद पवारांनी जेपीसी समितीवर आपले मत व्यक्त केले आहे, असे सांगून त्याचा उच्चार केला. मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २१ तारखेला होणाऱ्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर बैठकीत अजित पवारांचे नाव नसल्याविषयी बोलताना हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.
आमदार नितिन देशमुख यांच्या आंदोलनवर बोलताना महाविकास आघाडीच्या काळात असे आंदोलन केल्यावर अशा हजारो कसेसे आमच्या कार्यकर्त्यांवर लावल्या होत्या अशी आठवण करून देत ते म्हणाले, कोणत्याही आंदोलनाचा शेवट पोलिसांकडून अटक किंवा ताब्यात घेऊन होतो. आंदोलकांची मागणी सरकारने पूर्ण केली पाहिजे, तपासली पाहिजे ते सरकार करेल. कुणाच्या घरावर जाणे हे पोलिस कसे सहन करतील, असा प्रश्नही त्यांनी केला.
खारघर प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संवेदनशील आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठिक नसतानाही ते लक्ष देऊन आहेत. जे नुकसान झाले ते भरून निघू शकणार नाही, कुटुंबाच्या मागे सरकारने व समाजाने उभे राहायला हवे ते आम्ही करीत आहोत, असे सांगून त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
1
+1
+1
+1
+1