सामाजिक

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ पुनर्वसित क्षेत्र ठरणार खापरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Spread the love

नागपूर / अमित वानखडे

मिहान प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या खापरी गावाचे पुनर्वसन क्षेत्र महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ ठरणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सोबतच १२.५ टक्के प्लॉटची किमंत कमी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

खापरी पुनर्वसन क्षेत्रात ३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन श्री बानवकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कामठीचे आमदार टेकचंद सावकर, खापरीच्या सरपंच रेखा सोनटक्के, मिहानचे मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी व जिल्हा प्रशासनातील भूसंपादन सल्लागार विकास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

खापरी पुनर्वसन येथे मूळ गावठाणातील ४९७ घरमालकांना ५२.६९ कोटी रकमेचा भूसंपदान निवाडा करण्यात आला असून त्यापैकी ४६७ लोकांना मोदबला देण्यात आला आहे. गावठाणाबाहेरील २९८ घरांची मोजणी व मूल्यांकन त्वरित पूर्ण करून एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार असेही श्री बावनकुळे यांनी सांगितले.

कलकुही, तेल्हार, दहेगाव, खापरी येथील घरांच्या प्रलंबित यादीतील २३ अर्ज निकाली काढले असून उर्वरित १० अर्ज लवकरच निकाली काढले जाणार आहेत. स्थानिक लोकांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरी किंवा नोकरी एवजी ५ लक्ष रुपये अनुदान देण्याचे मिहानचे धोरण आहे. त्यापैकी ४४७ व्यक्तिंनी अनुदानाचा लाभ घेतला. कोर्ट केस मध्ये मागील ६ महिन्यात १९४ कोटी रुपये शासनाकडून मिळाले असल्याचे श्री बावनकुळे यांनी आर्वजून सांगितले.

खापरी रेल्वे येथील २८ हेक्टर क्षेत्रात ८९० भूखंडाचा पुनर्वसन डीपीआर तयार आहे. त्यामध्ये अंतर्गत रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, मल निस्सारण व विद्युतीकरण कामाची सुरुवात झाली असून हे पूनर्वसन सर्वोत्कृष्ठ व्हावे यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला जि.प. सदस्य मेघा मानकर, पं.स. सदस्य सुनीता बुचुंडे, उपसरपंच प्रमोद डेहनकर, माजी. जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, माजी सरपंच केशव सोनटक्के, सुनील कोढे, अरुण महाकाळकर, शेखर उपरे, गणेश बारई, विनोद ठाकरे, सचिन म्हस्के, रसिका डुबडुबे, सविता मसराम, प्रियमखा थुल, रसिका चपले, प्रतिभा रोकडे, शालिनी भूसे, रामेश्वर कुर्जेकर, आर.पी. खोडकुंभे, दीपक जोशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close