आदिवासी कृती समितीच्या वतीनेभव्य निषेध मोर्चाचे आयोजन
महिलांच्या नग्न धिंड काढल्याच्या घटनेचा व निष्क्रिय व नैतिकता हरविलेल्या
राज्य व केंद्र शासनाचा निषेध
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद / मणिपूर राज्यातील महिलांची नग्न अवस्थेत काढलेली धिंड बलात्कार करून केलेली हत्येचे घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याने आदिवासी युवकाच्या अंगावर लघवी केली या अमान्य कृत्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी. समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपारिक रूढी परंपरा व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये. या मागणीसह मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर महामानवाबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन महिलांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती मोर्चा आयोजक कृती समितीने दिली आहे. आयोजित मोर्चामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन मोर्चाचे आयोजक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.
मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत. हे पुरेसे नसताना याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे. माजी सैनिकाच्या पत्नीसह इतर महिलांना पूर्णता नग्न करून धिंड काढली जात आहे. एक नव्हे शेकडोंच्या संख्येतील नराधमांनी छेडखानी, बलात्कार, खून, असे प्रकार करून समाजात दहशत माजवली आहे. आणि मनिपुर राज्य व केंद्र सरकारच्या भाजपने अश्या नराधमांची पाठीराखन करीत चुप्पी साधत आहे. पिडीत महिला आदिवासी समाजाच्या आहे, परंतु देशामध्ये मुली महिलांना आदराने सन्मानाने वागण्याची संस्कृती प्रथा परंपरा आहे. त्यामुळे आदिवासीच नव्हे तर देशातील कोणत्याही जातीतील महिलांवर अश्या प्रकारचे अन्याय होता कामा नये,
अशीच समानतेची, आदराची आणि सन्मानाची शिकवण भारतीय राज्यघटनेने आहे. दिली
असे असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांची नग्न धिंड काढल्या जाते. आणि सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. सारेकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. अशी घटना घडल्यानंतर मणिपूर च्या राज्य व केंद्र शासनातील भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही. महिलेच्या नग्न धिंड च्या घटनेनंतर संपूर्ण देशात दहशत माजली आहे. अशा आरोपींना वेळीच फाशीची शिक्षा झाली नाही तर असे गावगुंड यांना बळ मिळेल आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होईल त्यामुळे अशा मानसिकता असणाऱ्यांना जागीच ठेचण्याची गरज आहे. तेव्हा यातील दोषींवर फाशीच्या शिक्ष सोबतच महिला मुलींसोबतच देशवासीयांमध्ये पसरलेली दहशत कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत मणिपूर केंद्र व राज्य सरकारच्या निषेध नोंदविण्यासाठी पुसद येथे भव्य आक्रोश मोर्चा 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनी आयोजित केली असल्याची माहिती आदिवासी कृती समिती पुसदचे अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी येथील रामकृष्ण हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तसेच सर्व सामाजिक संघटनांनी व महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या भारतीय नागरिकांनी या निषेध मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा मोर्च्याच्या आयोजकांनी केले आहे. त्याबरोबरच नेहमीच वादग्रस्त असलेल्या व आपल्या वादग्रस्त विधानातून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अप शब्दाचा वापर कर सामाजिक भावना दुखावणे, देश विरोधी वक्तव्यातून वाद निर्माण करणारे यांना लगाम न लावल्यामुळे त्यांनी आज महामानवांच्या विरोधात बोलायला सुरुवात तुकाराम भिडे ने केली आहे त्यामुळे महामानवानबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या मनोहर उर्फ संभाजी भिडे चा निषेध सुद्धा या मोर्चातून नोंदविल्या जाणार असल्याची माहिती कृती समितीने ‘दिली आहे.
सदर भव्य आक्रोश मोर्चा पुसद येथील बिरसा मुंडा चौक येथून सुरुवात होणारा आसून तहसील कार्यालय परिसरातील यशवंत रंग मंदिरावर या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या भव्य आक्रोश मोर्चामध्ये तमाम आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे. त्यासोबतच महिलांचा आदर सन्मान राखणारे नागरिक तथा सामाजिक संघटनांचाही सहभाग होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली. यावेळी आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष माधवराव वैद्य, कार्याध्यक्ष एडवोकेट सुनील ढाले, उपाध्यक्ष सुरेश धनवे, सचिव नारायण कराळे, सर्व सदस्य व प्रसिद्धी प्रमुख मारोती भस्मे, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहे.