खा.डॉ.अनिल बोंडे यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा
वरूड/तुषार अकर्ते
राज्यसभा खासदार तथा भाजपाचे नवनिर्वाचित अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणुन वरूड तालुका भाजपा च्या वतीने साजरा करण्यात येत आहे. दि.४ ऑगस्ट रोज शुक्रवार रोजी पुसला आणि गणेशपुर येथे बोंडे यांचा ६४ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपुर व प्रभात हायस्कूल पुसला येथे ६४ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याच बरोबर लोकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी दोन्ही ठिकाणी ओपन जिम व हायमास लाईटचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी माजी.जि.प.सदस्य श्रीधर सोलव, शेघाट शहर प्रमुख निलेश फुटाणे, शेषराव श्रीराव, इंद्रभूषण सोंडे, रुपाली सोंडे, लीखार काकाजी, सचिन वाकडे, प्रज्वल श्रीराव, भागवत नारनवरे, गणपत नारनवरे, रमेश निवल, प्रभाकर कपले, राजू बागडे, त्रिशूल दिवाण, रमेश शिरभाते, सिद्धार्थ डोंगरे, संजय राऊत, संदीप डोंगरे, प्रज्वल श्रीराव, अशोक कोल्हे, अरुण मांडवे, सुनिल निमजे, दिलीप मांडवे, नरेश भांगे, निखिल काट्टे, मानोज बेंडे, राजु गोडबोले, प्रकाश बेंडे, प्रल्हाद वहाणे, प्रविण वाडबुद्धे, किसना बनाईत, प्रित्तम नारनवरे , मयंक बोबडे, प्रतिक वहाणे, चंद्रशेखर रेवतकर, हरेश कोल्हे, जगदीश कोल्हे, अशोक रेवतकर, लुकेश बांदरे, गोपाल वाडबुद्धे, यश मानेकर, नयन मांडवे ,भाजप पदाधिकारी, गावातील नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक नांदने यांचासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.