सामाजिक

अप्पर वर्धा धरणाची 3 वक्र दरवाजे 10सेमी ने उघडले,47 घनमीटर विसर्ग नदीपात्रात सुरू

Spread the love

मोर्शी(तालुका प्रतिनिधी)
सोमवार दि.5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 3 गेट 10 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून 47 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे सर्वप्रथम अप्पर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत मोर्शीच्या उपविभागीय अभियंता मनाली नंदागवळी कनिष्ठ अभियंता शुभम जयस्वाल यांच्या हस्ते धरण क्षेत्रातील पाण्याची विधीवत पूजाअर्चा करून 1,7 व 13 क्रमांकाचे गेट उघडण्यात आले. अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मोर्शीपासून अवघ्या 8 किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधर पावसामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढहोत असून वर्धानदीखालील भागातील नदी नाले इत्यादींचा विसर्ग नदीचे पात्रामध्ये येत असल्यामुळे नदीचे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता बघता व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे अप्पर वर्धा धरणाचे तेरापैकी 3 वक्रद्वार 10 सेंटीमीटरने उघडण्यात येऊन त्यामधून 47 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.दि.4 ऑगस्ट रोजी वर्धा नदी काठावरच्या गावातील ग्रामस्थांना तसेच मासेमाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.याबाबत अप्पर वर्धा धरण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती,वर्धा, यवतमाळ,चंद्रपूर यांना एक पत्र सुद्धा रवाना करण्यात आले होते.त्याची प्रतिलिपी मा.अधीक्षक अप्पर वर्धा प्रकल्प अमरावती,
पोलीस अधीक्षक ग्रामीण,उपविभागीय अधिकारी मोर्शी,
गटविकास अधिकारी मोर्शी,पोलीस स्टेशन मोर्शी यांना देण्यात आली होती.आज दि.5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असून विविध जिल्ह्यातील पर्यटकांनी अप्पर वर्धा धरणाच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी व नयनरम्य दृश्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.अप्पर वर्धा धरणाची जलपातळी जुलै अखेरपर्यंत 74 टक्केच्या खाली होती मात्र आता 5 ऑगस्ट रोजी पाण्याच्या साठ्याची रात्री 8वाजता टक्केवारी 79.12% एवढी आहे.अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी 342.50 मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी 341.12 मिलिमीटर झाली आहे.त्यामुळे जवळपास 79.12% धरण भरलेले आहे. सध्या धरणात पाण्याचा येवा 73 घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असल्यामुळे मध्यप्रदेशातून वाहत येणारी जामनदी व माडु नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अप्पर वर्धा धरणाची तीन गेट उघडण्याची पाळी आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close