राजकिय

मोठ्या पवारांचे लहान पवरांसाठी दार बंद –  एका बड्या नेत्याचे वक्तव्य

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                       राज्यात निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली नसली तरी येणाऱ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. गेल्या काही दिवसात अजित पवारांचे भाषण पाहता त्यांना पुन्हा मोठ्या पवारांकडे ( शरद पवार)  परत यायचे आहेत असे संकेत देत आहेत काय ? अश्या चर्चा राजकीय क्षेत्रात रंगल्या आहेत. कारण अजित पवारांचा महायुतीत कोंडमारा होत असल्याचे बोलल्या जात आहे. आणि यामुळेच हा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान शरद चंद्र पवार क्या राष्ट्रवादीत असलेल्या एका बड्या नेत्याने मोठ्या पवारांचे दार लहान पवरांसाठी बंद झाल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

 लोकसभेच्या प्रचारावेळी मोदींनी शरद पवारांवर टीका करताना भटकती आत्मा असा उल्लेख केला होता त्यावर त्यांनी असं म्हणायला नको होतं, असं अजित पवार म्हणाले होते. त्याचबरोबर शरद पवारांवर टीका करताना शब्द जपून वापरण्याचं आवाहनही त्यांनी आपल्यासोबतच्या आमदार-खासदारांना केलं होतं. तसंच लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांनी जाहीर व्यक्तव्य केलं होतं की, बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती.

दुसरीकडं महायुतीतील शिवसेना आणि भाजपचे नेते आमदार हे जाहीररित्या अजित पवारांवर आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना दिसत आहेत. अजित दादांना कारण नसताना सोबत घेऊन सत्तेत वाटेकरी केल्यानं भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. तसंच सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना अजित पवारांना मोकळेपणानं प्रचारही करता येत नाही. तसंच नुकतेच जागावाटपाच्या चर्चेवरुन भाजप-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची खबर आली होती. पण अशा मैत्रीपूर्ण लढतींना काही अर्थ नसतो असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना आता नो एन्ट्री असं म्हटल्याला महत्व प्राप्त झालं आहे. तसंच बारामतीत विधानसभेला शरद पवारांच्या पक्षाचाच उमेदवार जिंकणार असंही या नेत्यानं म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close