पितृ दोष असल्यास करावा लागतो या संकटांचा सामना
अनेक वेळा कुटुंबाला काही समस्यांचा सामना करावा लागतो.अनेक प्रयत्ना नंतरही कुटुंबात शांती, धनलाभ ,लग्न अश्या गोष्टीत अडथळे येत असतात. पंडितजी कडे या समस्या घेऊन गेल्यास ते कुटुंबात पितृदोष असल्याचे सांगतात. आता हे पितृदोष म्हणजे काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर घरातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्यावर आपण रीती रिवाजानुसार त्यांचे अंतिम संस्कार करतो.आणि त्यांच्या दिवसावर त्यांचे श्राद्ध आणि पूजा अर्चना करतो. पण त्यात काही चूक झाल्यास त्याचे वाईट परिणाम दिसतात.
पितर तुमच्यावर नाराज असल्याची लक्षणं
- प्रत्येक कामात अडथळा
पितर तुमच्यावर नाराज असल्यास तुमच्या सर्व कामांमध्ये सतत अडथळे निर्माण होतात. कितीही मेहनत केली तरीही कामात हवे तसे यश मिळत नाही.
- कुटुंबात सतत कलह
पितर नाराज असल्यावर कुटुंबात सतत कलह निर्माण होते. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांचा मत्सर करु लागतात.
- विवाहात अडथळे
पितर नाराज असल्यावर कुटुंबातील मुलगा किंवा मुलीच्या लग्नामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच वैवाहिक जीवनातही अनेक वाद निर्माण होतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच पितरांच्या नाराजीमुळे मुलं होण्यास अडथळे येतात.
- आजारपण
पितर नाराज असल्यास कुटुंबात सतत आजारपण राहते.
पितृदोषासाठी उपाय
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षात आपल्या पितरांचे तर्पण आणि श्राद्ध श्रद्धेने करावे. फक्त पितृपक्षच नाही तर कोणत्याही महिन्यातील अमावस्या, पौर्णिमा, त्रयोदशी आणि चतुर्दशी या तिथींना घराच्या दक्षिणेकडे तोंड करुन दिवा लावा. त्याचबरोबर दररोज सकाळी उठल्याबरोबर दक्षिणेकडे तोंड करुन पितरांना वंदन करा. पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
नवप्रहार या गोष्टींचे समर्थन करतो असे नाही. किंवा जे लोकांच्या मनात अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. जे लोक कर्मकांड मानतात त्यांना या बद्दल माहिती व्हावी हा त्यामागील हेतू आहे.