बिबट्या अभी जिंदा है

पळगाव बसवंत (नाशिक) / नवप्रहार डेस्क
वाहनाची धडक बसल्याने बिबट रस्त्यावर निपचित पडला होता. बिबट ठार झाला असे समजून रस्त्याने जाणारी वाहने थांबून काय झाले हे पहात होती. काजी अती उत्साही लोकांनी बिबट्या च्या जवळ जात परिस्थितीचा अंदाज घेतला. काही लोकांनी सवयी प्रमाणे सेल्फी काढल्या . इतक्यात बिबट्याला चेव आला. बिबट उठून बसताच पळापळ माजली. बिबट कोणालाही इजा न पोहचवता झुडपात निघून गेले.
निफाड तालुक्यातील कोकणगाव शिवारात मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. तेव्हा काही वाहनधारकांनी गाड्या थांबवून बिबट्या मेला असावा म्हणनू गाड्या थांबवून बिबट्याच्या जवळ जाऊ लागले. एकेक करीत वाहने थांबत राहिली आणि गर्दी वाढत गेली. परिसरातील नागरिकांचीही बिबट्याला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी होऊ लागली. काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये बिबट्याचा व्हिडीओ व फोटो चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत गोंधळ सुरू केला. गोंगाट वाढत असतानाच काही वेळापूर्वी निपचित पडलेला बिबट्या अचानक खाडकन उठून उभा राहिला. तेव्हा उपस्थितांची मोठी तारांबळ उडाली. जीव मुठीत घेऊन लोक मिळेल त्या दिशेने पळू लागले. मात्र घाबरलेल्या बिबट्याने जखमी अवस्थेतच रस्त्याच्या कडेला अंधारात धूम ठोकली.
संभाजीनगरमध्ये पंधरा पथके बिबट्याच्या मागावर
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याचे दर्शन होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला असून, तो शहराबाहेर जाण्यासाठी मार्ग शोधत आहे. शनिवारी बिबट्याच्या शोधार्थ सेव्हन हिल ते एमजीएम, परिसर पिंजला आहे.
छत्रपती संभाजीनगर वनविभाग, भारतीय सेनेची इकॉलॉजिकल टास्क फोर्स बटालियन आणि नाशिक रेस्क्यू टीमसह ६० पेक्षा अधिक लोकांची पंधरा पथके पाच दिवसांपासून बिबट्याच्या मागावर आहेत.