सामाजिक

शहराच्या नवीन बस स्थानकाचे भूमीपूजन आभासी पद्धतीने संपन्न

Spread the love

धामणगाव रेल्वे,/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातील धामणगाव रेल्वे बस स्थानकाच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले याप्रसंगी  धामणगाव रेल्वेच्या बस स्थानकावर आमदार प्रताप अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

यावेळी मंचावर तहसीलदार वशिमा शेख मुख्याधिकारी गीता वंजारी बीडिओ माया वानखडे तालुका भाजपाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर माजी अध्यक्ष मनोज डहाके शहराध्यक्ष गिरीश भुतडा विठ्ठलराव राळेकर अमरावती विभाग नियंत्रक बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होते

————————————

बॉक्स…..

धामणगाव येथे स्मार्ट बस स्थानक होणार ..अडसड

मी आपल्या मतदारसंघाकरीता मागणी केल्याप्रमाणे धामणगावला सुसज्ज आणि सर्व सुविधा युक्त बसस्थानकाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ कोटी रुपये मंजूर केले असून राज्यात २४ बस  स्थानकांच्या बांधकाम कार्यक्रमाचे भूमिपूजन आज आभासी पद्धतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले धामणगाव सोबतच चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर येथील सुद्धा बस स्टँड करिता येणाऱ्या काळात मोठा निधी आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहेच सोबतच  धामणगाव बस स्थानक डेपो व्हावे ही मागणी सुद्धा मी संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेली असून याकरीता अनेक तांत्रिक अडचणी असताना सुद्धा धामणगावला डेपो व्हावे याकरिता माझे पुरेपूर प्रयत्न सुरूच आहे आणि ते प्रयत्न पूर्ण होतील असा  विश्वास मला आहे धामणगावात होणाऱ्या सर्व सुविधा युक्त बस स्टॅन्ड इमारत अध्ययावत व सर्व सुविधा युक्त होणार आहे येथील बस स्थानकाचे काम उच्च दर्जाचे असेल असे उपरोक्त प्रसंगी आमदार प्रताप अडसड म्हणाले

—–  —————    —

उपरोक्त प्रसंगी मुख्याधिकारी गीता वंजारी तहसीलदार वसीमा शेख व बिडिओ माया वानखडे यांनी एसटी बाबत मत व्यक्त केलेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व संचालन प्रसिद्ध वक्ते प्रतिक ठाकरे यांनी केले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close