Uncategorized

बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून ग्राहकाने त्याला चाकूने भोसकले

Spread the love

 बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून ग्राहकाने त्याला चाकूने भोसकले

खामगाव / प्रतिनिधी

                  एकीकडे ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि ग्राहक आपल्या कडे आकर्षित व्हावे म्हणून अनेक बँका प्रयत्नशील असतात. पण काही बँकेतील कर्मचारी मात्र आपल्या स्वभावाने लाचार असतात. ते ग्राहकांना विनाकारण त्रास देतात. अश्याच त्रास देण्याऱ्या व्यवस्थापकाला ग्राहकाने चाकूने  भोसकले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या हल्ल्यात बँक मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे. शंतनू राऊत असं बँक मॅनेजरचं नाव आहे.

खामगाव तालुक्यातील जळका भडंगमधील किरण गायगोळ नावाचा शेतकरी त्याच्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता. या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली होती, त्यामुळे आपल्याला पैसे काढायला त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

सकाळी 11 वाजल्यापासून हा शेतकरी बँकेत येऊन थांबला होता, पण शेतकरी बचत गटाता मूळ ठराव नसल्याचं कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात होता, त्यामुळे शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भोसकलं. या हल्ल्यात बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे. बँक मॅनेजरला तातडीने खामगाव शहरातील सिल्व्हरसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

शेतकरी आणि बँक मॅनेजरमध्ये झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकरही जखमी झाले आहेत. आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close