हटके

मुलीच्या डोकेदुखी साठी भोंदूबाबा कडे गेलेल्या वडिलांची बाबा च्या कृत्यामुळे डोकेदुखी वाढली 

Spread the love

नेर / प्रतिनिधी

                      यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या वडिलांना आपल्या मुलीला उपचारासाठी बाबा कडे घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. बाबा मुलीला यात्रेला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पसार झाला आहे. प्रकाश जनार्दन नाईक महाराज असे त्या भोंदूबाबा चे नाव असून मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली आहे .सध्या परिसरात या घटनेची चांगलीच चर्चा आहे.  पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे.

याबाबत माहिती अशी की, तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. नंतर तिच्या बहिणीलाही त्रास होऊ लागला. यामुळे मुलींच्या वडिलांनी प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे ते घेऊन गेले. दरम्यान, महाराजांनी उपचारदरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. घटनेदिवशी प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले. लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून तरुणीला घेऊन गेले.

नंतर महाराज परत आलेच नाहीत. मुलीच्या वडिलांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल बंद आढळला. शेवटी मुलीच्या वडिलांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलीस सध्या त्यांचा तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुलीच्या घरच्यांना एकच धक्का बसला असून पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी पथके तयार केली आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close